ETV Bharat / city

उल्हासनगरात अतिक्रमण विरोधी पथकावर भंगारवाल्यांचा हल्ला - ulhasnagar update

अतिक्रमण विरोधी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या बाजूला सांगताच, तो कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करायला लागला. व आजूबाजूच्या दुकानदारांना "महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना येथून जाऊ देऊ नका. यांना आपण काय आहोत ही दाखवण्याची वेळ आली आहे" अशी चिथावणी देऊन सरकारी कामात अडथळा निर्माण आणत होते.

भंगारवाल्यांनी केला हल्ला
भंगारवाल्यांनी केला हल्ला
author img

By

Published : Jun 26, 2021, 12:19 PM IST

ठाणे - उल्हासनगर महानगरपालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक अतिक्रमण हटविण्याचे काम करत होते. तेव्हा, त्यांच्यावर भंगार खरेदी विक्री करणाऱ्या दुकानदारांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी ४ हल्लेखोरांविरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तस्लिम खान, तौफिक खान, तरकीब खान, भीम अशा हल्लेखोर दुकानदारांची नावे आहेत.

भंगारवाल्यांनी केला हल्ला
भंगारवाल्यांनी केला हल्ला
कामगारांना शिवीगाळ
उल्हासनगर कॅम्प नंबर ३ येथील उल्हासनगर महापालिका मुख्यालयाच्यामागे मोहटादेवी मंदिरजवळ भंगारगल्ली आहे. या गल्ली मध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला व फुटपाथवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. आणि पादचाऱ्यांनादेखील चालणे मुश्कील होते. महानगरपालिकेचे अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रकाश राजू सकट, अनिल राठी, अण्णासाहेब बोरोडे, वसंत वळवी, महेंद्र कारेकर, आत्माराम सोनवणे, जयसिंग कदम, राजू लावरी, भावेश काकडे हे जेसीबी मशीनच्या साहाय्याने अतिक्रमणे हटविण्याची कारवाई करत होते. त्यावेळेस जेसीबी मशीन समोर तरकीब फरीद खान हा त्याची बुलेट घेऊन आला. आणि शिवीगाळ करत कामात अडथळा आणत होता.
कामगांराना लोखंडी रॉडने मारहाण
अतिक्रमण विरोधी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या बाजूला सांगताच, तो कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करायला लागला. व आजूबाजूच्या दुकानदारांना "महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना येथून जाऊ देऊ नका. यांना आपण काय आहोत ही दाखवण्याची वेळ आली आहे" अशी चिथावणी देऊन सरकारी कामात अडथळा निर्माण आणत होते. तस्लिम खान, तौफिक खान, तरकीब खान, भीम या आरोपींनी प्रकाश सकट यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच मनपाचे व्हॅन ड्रायव्हर शेखर सपकाळे, महेंद्र कारेकर, अनिल राठी यांनाही लोखंडी रॉडने जबर मारहाण केली.

हेही वाचा - ओबीसी आरक्षणावरील स्थगितीवरून भाजपा आक्रमक; राज्यभर चक्काजाम आंदोलन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.