ठाणे : मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील १५८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षाचे उमेदवार नशीब अजमावत (Thane district Gram Panchayats Election) आहेत. विशेष म्हणजे ठाकरे गट व शिंदे गटातील सत्ता संघर्षानंतर जिल्ह्यात पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत १५८ पैकी ३१ सरपंच बिनविरोध निवडणून आले (Sarpanch unopposed in gram panchayat election) आहेत. यामध्ये ठाकरे गट, शिंदे गटासह राष्ट्रवादी आणि भाजप या चारही राजकीय पक्षाचे सरपंच बिनविरोध निवडून आले. शिवाय १ हजार ४५३ सदस्यापैकी ४८७ सदस्य बिनविरोध निवडून आले आहे. तर उर्वरित ११९ थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षाचे उमेदवार मैदानात असल्याने निवडणूक रंगतदार ठरली आहे.
सर्वाधिक शहापूर तालुक्यातील निवडणुका - जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींचा कारभार गेल्या ९ महिन्यांपासून कारभार प्रशासकांच्या हाती देण्यात आला होता. ग्रामपंचायतींच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या कालावधीसाठी ग्रामपंचायतींच्या कारभाराचे अधिकार प्रशासकांना देण्यात आले होते. आता लोकशाही पद्धतीची स्थानिक स्वराज्य कमिटी स्थापित झालेली पहायला मिळणार आहे. जिल्ह्यातील तीन तालुक्यात प्रामख्याने ग्रामपंचायत निवडणुका गाजणार आहे. यापैकी सर्वाधिक शहापूर तालुक्यातील ७९ ग्रामपंचायती त्या खालोखाल मुरबाड तालुक्यातील ३५ ग्रामपंचायती तर भिवंडी तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत. यापैकी भिवंडी २ शहापूर १३ तर मुरबाड मध्ये १० सरपंच बिनविरोध निवडणून आले आहे. त्यामुळे भिवंडीत २९ शहापूरमध्ये ६६ आणि मुरबाडमध्ये २५ ग्रामपंचात निवडणुकीत कोण बाजी मारणार हे निकालानंतर समोर येणार (Gram Panchayats Election 2022) आहे.
राजकीय नेत्यांची प्रतिष्ठापणाला - तिन्ही तालुक्यातील मुरबाडमध्ये भाजप आमदार किसन कथोरे यांचे वर्चस्व असून येथील सर्वाधिक ग्रामपंचायती भाजपाच्या ताब्यात आहेत. मात्र मुरबाडमध्ये शिंदे गटासह राष्ट्रवादीचे तगडे आव्हान भाजप समोर असेल, तर भिवंडी ग्रामीणमध्ये शिंदे गटाचे आमदार शांताराम मोरे असून या तालुक्यात भाजप, राष्ट्रवादीसह ठाकरे व शिंदे गटाचे वर्चस्व असल्याने या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये चौरंगी लढती आहेत. मात्र सर्वाधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका असलेल्या शहापूर तालुक्यात राष्ट्रवादीचे आमदार दौलत दरोडा असून या तालुक्यात राष्ट्रवादी, शिवसेना , भाजपसह शिंदे गटा शिवाय भारतीय कम्युनिस्ट पार्टीचेही काही भागात वर्चस्व असल्याने पंचरंगी लढती होणार आहेत. तर मनसेचे उमेदवारही अनेक ग्रामपंचायतीमध्ये लढत देत आहेत. यामुळे सर्वच राजकीय नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागली (gram panchayat election in Thane) आहे.
२५ ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका नाही - जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील ७९, कल्याण ७, अंबरनाथ १, ठाणे ५, भिवंडी ३१, मुरबाड ३५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर करण्यात आला. यापैकी जिल्ह्यात १८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तर ठाणे तालुक्यातील पाच ग्रामपंचायत निवडणुकीत बहिष्कार आहे. तर २० ग्रामपंचायतीमधून एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याने या ठिकाणी निवडणुका होणार (Sarpanch unopposed In Thane district) नाहीत.
मुख्यमंत्र्याच्या जिल्ह्यात ‘ हे’ महत्वाचे ठरणार - निवडणुकीची ही अधिसूचना जारी होताच, निवडणुकीच्या कार्यक्रमाची गेल्या ९ महिन्यांपासून वाट पाहत बसलेल्या गावागावात निवडणूकीच्या प्रचाराला वेग आला. यानिमित्ताने जूने हेवे-दावे, राजकीय मतभेद देखील उफाळून येत असल्याचे दिसून आले आहे. दुसरीकडे राज्य शासनाने बिनविरोध निवडणुका घेणाऱ्या ग्रामपंचायतींना भरघोस निधीच्या बक्षीसाची योजना देखील पुढे केली आहे. मात्र राज्यातील सत्ता संघर्षानंतर ठाकरे आणि शिंदे गट आमने सामने आल्याने या जिल्ह्यातील ११९ थेट सरपंच पदाच्या तर ८५५ सदस्य ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या मैदानात तळ ठोकून आहेत. आता १६ ऑक्टोंबरनंतरच मुख्यमंत्र्याच्या जिल्ह्यातील ग्रामपंचात निवडणुकांमध्ये कोणत्या पक्षाच्या पारड्यात मतदारांनी भरभरून मतदान केले, हे पाहणे महत्वाचे ठरणार (gram panchayat election) आहे.