ठाणे - मनसुख हिरेन हत्या प्रकरणात वादग्रस्त ठरलेले सचिन वाझे यांनी ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. या जमिनीच्या अर्जवर 19 मार्च, रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
19 मार्चला ठाणे सेशन न्यायालयात सुनावणी-
यापूर्वी ख्वाजा युनिस चकमकीत वादग्रस्त ठरलेले, नुकतीच अंबानी यांच्या घरासमोर आढळलेली स्फोटकाची कार आणि मनसुख हत्या प्रकरणात संशयास्पद भूमिकेत असलेले पोलीस उप-निरीक्षक सचिन वाझे यांना वादग्रस्त प्रकरणात अटक होण्याची शक्यता वाढत आहे. दरम्यान त्यांनी सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. याप्रकरणी 19 मार्चला ठाणे सत्र न्यायालयात यावर सुनावणी होणार आहे.
सचिन वाझे यांची चारवेळा एटीएस पथकाने केली चौकशी-
मनसुख हत्या प्रकरणात संशय सचिन वाझे यांच्यावर असून तपास करणाऱ्या एटीएस पथकाने अज्ञात इसमाच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. वाझे यांच्यावर संशय बाळावल्याने त्यांनी हा अटकपूर्व जामीन अर्ज केल्याचे समजते. मनसुख हत्या प्रकरणात सचिन वाझे यांची चारवेळा एटीएस पथकाने चौकशी केली आहे.
एनआयए पथक देखील लवकरच सचिन वाझे यांची चौकशी करण्याची शक्यता बळावलेली आहे. त्यातच अटकेची शक्यता वाढलेली आहे. गुरुवारी सचिन वाझे यांची बदली विशेष ब्रांचमध्ये केल्याने तपास यंत्रणेला वाझे यांच्यावर संशय असल्यानेच वाझे यांनी ठाणे सेशन न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.
हेही वाचा- राज्यात अनेक ठिकाणी संचारबंदी, अंशत: टाळेबंदी; प्रसार रोखण्यासाठी यंत्रणा कामाला