ETV Bharat / city

Rakshabandhan: ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या नावाने राख्या, नागरिकांची मोठ्या प्रमाणात पसंती

रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून आपले रक्षण करण्याचे वचन मागते आणि भाऊ सुद्धा तिचे सदैव रक्षण करण्याचे वचन देतो, या रक्षाबंधन सणानिमित्त दरवर्षी विविध प्रकारच्या रंगी-बेरंगी आणि ( Chief Minister Eknath Shinde ) अनोख्या राख्यांनी बाजारपेठीतील दुकान अगदी फुलून जातात, आणि या राख्यांमध्ये दरवर्षी नव्याने राख्यांचा एक ट्रेंड पाहायला मिळतो.

ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या नावाने राख्या
ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या नावाने राख्या
author img

By

Published : Jul 25, 2022, 8:38 PM IST

ठाणे - बहीण भावा मधील अतूट नात्याला एका रेशमाच्या धाग्याने बळकटी मिळू शकते हे दर्शवणारा सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून आपले रक्षण करण्याचे वचन मागते आणि भाऊ सुद्धा तिचे सदैव रक्षण करण्याचे वचन देतो, या रक्षाबंधन सणानिमित्त दरवर्षी विविध प्रकारच्या रंगी-बेरंगी आणि अनोख्या राख्यांनी बाजारपेठीतील दुकान अगदी फुलून जातात, आणि या राख्यांमध्ये दरवर्षी नव्याने राख्यांचा एक ट्रेंड पाहायला मिळतो. तसाच ट्रेंड यंदा ठाण्यात देखील पाहायला मिळतोय, तो म्हणजे ठाण्यातील नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावांच्या राख्यांचा.

ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या नावाने राख्या

अनोख्या राख्या - बहीण आणि भाऊ यांच्या अतूट प्रेमाचे बंधन असणारा सण म्हणजे रक्षाबंधन. आणि काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या या सणानिमित्त बाजारपेठा विविध प्रकारच्या रंगी बेरंगी, चमकदार आणि अनोख्या राख्यांनी सज्ज झालेल्या पाहायला मिळत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही वेगवेगळे ट्रेंड राख्यांमध्ये पाहायला मिळत असतांना ठाण्यात यंदा सर्वांचे लक्ष वेधले जात आहे. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राख्यांनी. याअगोदर आपण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेल्या राख्या पाहिल्या आहेत. मात्र, आता ठाण्यात प्रथमच ठाणेकर असलेल्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद मिळाल्याने त्यांच्या फोटोच्या राख्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.

ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या नावाने राख्या
ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या नावाने राख्या

राज्यातील बहिणीचे संरक्षण करतील - आपला मुख्यमंत्री, मी एकनाथ शिंदे समर्थक,आपले मुख्यमंत्री असा मजकूर असलेल्या राख्या विक्रीसाठी आलेल्या पाहायला मिळत आहेत. आणि या राख्यांना ठाणेकरांनी पसंती देखील दिलेली पाहायला मिळत आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यां व्यक्तीपर्यंत सर्वच या राखीला पसंती देत आहेत. भाऊ हा बहिणीचे संरक्षण करतो. त्याचप्रमाणे आमचे ठाण्याचे भाऊ आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आमचे संरक्षण करतील, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्याने ठाण्याच्या बहिणींचेच नाही तर राज्यातील बहिणीचे संरक्षण करतील या उद्देशाने या राख्या बनवल्या असल्याच्या भावना राखी विक्रेता कल्पना गांगर यांनी व्यक्त केल्या आहेत.

ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या नावाने राख्या
ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या नावाने राख्या

1 ऑगस्ट पासून ठाणेकरांना मिळणार 50 एमएलडी अतिरिक्त पाण्याचा लाभ - ठाणे शहराला दररोज 485 दशलक्ष मिलिलिटर एवढा पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, वाढत्या लोकसंख्येमुळे तो देखील अपुरा पडू लागला होता. या पाणीटंचाईचा सगळ्यात जास्त त्रास होतो, तो महिलांना आणि या बहिणींनाच एक रक्षाबंधनाची भेट देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडून झाला आहे. मध्ये वैतरणा जलाशयाची उंची वाढवण्यात आल्याने जास्त पाणी अडवणे शक्य होते.

ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या नावाने राख्या
ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या नावाने राख्या

मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्विकारल्यावर शहराला पहिली मोठी भेट - आता ठाणे शहराला 100 एमएलडी अतिरिक्त पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी ठाणे महानगरपालिकेने मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या बैठकीत जलसंपदा विभागाकडे करण्यात आली होती. या मागणीला अनुसरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे पाणी तातडीने देण्याचे निर्देश जलसंपदा विभागाला दिले होते. त्यानुसार ठाणे शहराची तातडीची गरज भागवण्यासाठी जलसंपदा विभागाने 50 एमएलडी पाणी येत्या 1 ऑगस्ट पासून ठाणे शहराला देण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्विकारल्यावर शहराला पहिली मोठी भेट मिळाली आहे.

हेही वाचा - दिपक केसरकरांनी उद्धव ठाकरेंना फटकारले; जनतेला भावनिक करण्यापेक्षा तीन प्रश्नांची उत्तरे द्या!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.