ठाणे - जर पंधरा वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी कानाखाली लगावली नसती तर, आजही आपल्याला तेच चित्र पाहायला मिळाले असते. दुकानांवर देखील हिंदी आणि इंग्रजीमध्येच पाट्या पाहायला मिळाल्या असत्या. मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या लढ्याचे आज हे फळ आहे. महाराष्ट्रात जर मराठी पाट्यांसाठी कोणाच्या काचा, दुकाने फोडावे लागत असतील तर ते लज्जास्पद आहे, असे शर्मिला ठाकरे ( Rashmi thackeray comment on marathi boards ) या ठाण्यातील मनसेच्या वतीने महिलांसाठी आयोजित कार्यक्रमात बोलल्या.
हेही वाचा - Video : युक्रेनमध्ये ठाण्यातील 17 विद्यार्थी अडकले; युद्धजन्य परिस्थितीचा पाठवला व्हिडिओ
मराठी भाषा दिन म्हणून आजच्याच दिवशी नाही तर, वर्षांचे 365 दिवस मराठीतच बोलले पाहिजे व यापुढे सर्व नागरिकांनी मराठीतच बोलावे, असे आवाहन शर्मिला ठाकरे यांनी महिला मनसे पदाधिकाऱ्यांना केले. समाजात आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या लोकांना आरक्षण दिले पाहिजे, असे देखील आरक्षणाच्या मुद्यावर शर्मिला ठाकरे बोलल्या. लता दीदींच्या स्मारकापेक्षा त्यांच्या आठवणीत मोठे संगीत विद्यापीठ सुरू करावे, असे मत यावेळी शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केले.
पालिका निवडणुकीच्या आधी मनसेचा कार्यक्रम
आगामी पालिका निवडणुका लक्षात घेता सर्वच राजकीय पक्ष हे कामाला लागलेले आहेत. असे असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देखील ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये महिलांचा गुणगौरव आणि हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी शर्मिला ठाकरे ठाण्यात आल्या होत्या. मनसे देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा - अमुता फडणवीस यांच्याबाबतचे 'ते' वक्तव्य राष्ट्रवादीच्या नेत्याला भोवले