ठाणे - पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या किंमती वाहतुकीचा वाढलेला खर्च आणि एकूणच झालेले महागाई या सर्व दुष्ट चक्रामध्ये सर्वसामान्य माणूस भरडला जात असताना आता त्यात जीवनावश्यक असलेल्या दुधामुळे आणखी भर पडली आहे. अचानक वाढलेल्या किंमतीमुळे नागरिक हवालदिल झाले आहेत.
दुधाच्या किंमती दोन रुपयापासून चार रुपयांपर्यंत वाढले आहेत ( Milk Prices Hike ) आणि या वाढलेल्या किंमतीमुळे महिन्याचे बजेट हाताळणाऱ्या गृहिणी आणि नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. एकूणच पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्यामुळे महागाईत भर पडली असताना आता दुधाचे दरही वाढले आहेत. सरकारने यावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे, असे ग्राहकांचे म्हणणे आहे.
दुधाला पर्याय नाही, विक्रीवर होतो परिणाम - दूध ही अत्यावश्यक बाब असून त्याला दुसरा पर्याय नाही. दूधाच्या किंमती वाढल्याने त्यांचा परिणाम दुग्धजन्य पदार्थांवरही होतो. त्यामुळे नागरिकांना निमूटपणे ही दरवाढ सहन करावी लागते. पण, यामुळे दुधाच्या विक्रीवर परिणाम होतो. जे ग्राहक दोन लिटर दूध घेत होते ते आता दीड लिटर घेत असल्याचे विक्रेते सांगत आहेत. यामुळे एकूणच व्यवसायावर परिणाम होत असल्याचे विक्रेते सांगत आहे.
गोकुळ 4 रुपयांनी महागले - गोकुळ दूध आजपासून (दि. 19 एप्रिल) महागले असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर आणखी ताण आला आहे. इतर महासंघाच्या दुधांमध्येही 1 ते 2 रुपयांची वाढ झालेली आहे.
ब्रँडेड दुधावर घालणार बहिष्कार - महाराष्ट्रात जी दूध विक्री होते. त्यात गोकुळ, वारणा, चितळे, अमूल या ब्रँडेड दुधाची विक्री मोठ्या प्रमाणात आहे. सुट्या दुधाचीही विक्री मोठ्या प्रमाणात आहे. पण, त्याची दरवाढ सीमित प्रमाणात आहे. त्यामुळे ब्रॅण्डेड दूध किंमत मोठ्या प्रमाणात महाग आहे. त्याचा परिमाण शेतकऱ्याच्या उत्पन्नावर होत नाही.
कमिशन वाढले नाही तर घालणार बहिष्कार - मागील अनेक वर्षांपासून दूध वितरक हे दुधाच्या वाढीव किंमतीत दूध विकतात. पण, जर 4 रुपयांनी किंमती वाढल्या तर कमिशन काही वाढले नाही. म्हणून ठाण्यात वितरक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. किमान दहा टक्के वाढवले नाही तर 1 मेपासून दूध विक्री बंद करण्याचा इशारा दिला आहे.
हेही वाचा - महागाईविरोधात राष्ट्रवादीने ठाण्यात लावले 'श्री राम, जय राम'चे होर्डींग्ज