ETV Bharat / city

फ्रंटलाईन वर्कर दर्जासाठी वीज कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन - वीज कंत्राटी कामगार

फ्रंटलाईन वर्करचा दर्जा मिळण्याच्या मागणीसाठी महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती वीज कंपनीच्या कामगारांनी सोमवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन ठाणे जिल्ह्यात सुरू केले आहे.

बेमुदत कामबंद आंदोलन
बेमुदत कामबंद आंदोलन
author img

By

Published : May 24, 2021, 7:34 PM IST

ठाणे - फ्रंटलाईन वर्करचा दर्जा मिळण्याच्या मागणीसाठी महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती वीज कंपनीच्या कामगारांनी सोमवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन ठाणे जिल्ह्यात सुरू केले आहे. यामध्ये कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांसह तिन्ही वीज कंपन्यांमधील कंत्राटी कर्मचारीही सहभागी झाले आहेत.

विविध मागण्यांसाठी अंदोलन
वीज कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देऊन शासकीय लाभ मिळावेत. वीज कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनाही लसीकरणासाठी प्राधान्य द्यावे. कोरोनाबाधित कंत्राटी कर्मचाऱ्याला 30 ऐवजी 50 लाखांचे सानुग्रह अनुदान मिळावे. कोविडचा उद्रेक पाहता वीज बिल वसुलीची सक्ती करू नये आदी प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू झाले आहे. ज्यामध्ये वीज कंत्राटी कामगार संघासह कायम कामगारस्वरूपी कर्मचारी-अभियंता संघटनेच्या कृती समितीही सहभागी झाली आहे.

'कोविड हॉस्पिटलचा वीज पुरवठा खंडित होणार नाही'
या आंदोलनादरम्यान वीज ग्राहकांचा विशेषतः कोविड हॉस्पिटलचा वीज पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घेतली जाणार असून उर्वरित कोणतीही कामे केली जाणार नसल्याचेही वीज कंत्राटी कामगार संघटनेच्या मनोज मनुचारी यांनी सांगितले.

हेही वाचा - मतदारसंघात आदित्य ठाकरे दाखवा अन् मोफत लसीकरण मिळवा - अतुल भातखळकर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.