ETV Bharat / city

Thane district election : मुरबाड व शहापूर नगरपंचायती निवडणूक; अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणी राजकीय उलथापालथ - Murbad and Shahapur Nagar Panchayat Elections

ओबीसी प्रभागात निवडणूक लढविण्यासाठी ऐनवेळी राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती दिल्याने त्याला मुरबाडमधील भाजपाचे आमदार किसन कथोरे ( BJP MLA Kisan Chathore slammed state gov ) यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करीत स्थगितीला विरोध केला. त्यांनी सर्वच नगरपंचायतीच्या निवडणुका रद्द करण्याची मागणी केली आहे. तर प्रहार अपंग संघटनेचे मुरबाड तालुका अध्यक्ष शरद पाटील ( Prahar Sanghatana Murbad Taluka ) यांनी मुरबाड मधील १७ ही जागा लढविण्याचा निर्धार केला आहे.

मुरबाड व शहापूर नगरपंचायती निवडणूक
मुरबाड व शहापूर नगरपंचायती निवडणूक
author img

By

Published : Dec 7, 2021, 9:23 PM IST

Updated : Dec 7, 2021, 10:54 PM IST

ठाणे - ठाणे जिल्ह्यातील प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या मुरबाड ( Murbad Nagarpanchayat Election ) आणि शहापूर नगर पंचायतीच्या ( Shahapur Nagar Panchayat Election ) सार्वत्रिक निवडणुकीच्या अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दोन्ही तालुक्यात राजकीय उलथापालथ झाली आहे. ऐन वेळी मुरबाडचे शिवसेना प्रमुखाने भाजपच्या तंबूत दाखल होत उमेदवारी अर्ज भाजपच्यावतीने दाखल केला. तर शहापूर नगर पंचायतीत निवडणुकीत राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या तालुका अध्यक्षांनी ( Bacchu Kadus Prahar Janshakti in Shahapur ) शिवसेनेला पाठिंबा दिला आहे.

ओबीसी प्रभागात निवडणूक लढविण्यासाठी ऐनवेळी राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती दिल्याने त्याला मुरबाडमधील भाजपचे आमदार किसन कथोरे ( BJP MLA Kisan Chathore slammed state gov ) यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करीत स्थगितीला विरोध केला. त्यांनी सर्वच नगरपंचायतीच्या निवडणुका रद्द करण्याची मागणी केली आहे. तर प्रहार अपंग संघटनेचे मुरबाड तालुका अध्यक्ष शरद पाटील ( Prahar Sanghatana Murbad Taluka ) यांनी मुरबाड मधील १७ ही जागा लढविण्याचा निर्धार केला आहे. त्यांनी प्रशांत तेलवणे ( Prashant Telvane as candidate in Murbad election ) नावाच्या दिव्यांगाला उमेदवारी देऊन सर्वच राजकीय पक्षांना बुचकळ्यात पाडले आहे. तर सर्वच राजकीय पक्षाला बंडखोरीची लागण होऊन अनेक इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या मैदानात अपक्ष म्हणून आपले नशीब अजमावित आहेत.

अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणी राजकीय उलथापालथ

हेही वाचा-shivsena joining upa Possibility - शिवसेनेच्या युपीए प्रवेशाबाबत लवकरच निर्णय घेणार - खासदार संजय राऊत

मुरबाड आणि शहापूर नगरपंचायतमध्ये १७ -१७ जागेसाठी निवडणूक
जिल्ह्यातील मुरबाड आणि शहापूर नगरपंचायतमध्ये १७ - १७ जागेसाठी निवडणूक होत आहे. मुरबाड नगरपंचायत ही सध्याच्या घडीला भाजपच्या ताब्यात आहे. तर शहापूर नगरपंचायत शिवसेनेच्या ताब्यात आहे. मात्र, कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गेल्या एक वर्षापासून दोन्ही नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. परंतु नुकताच निवडणूक आयोगाने निवडणूकी जाहीर करताच ग्रामीण भागात राजकीय वातावरण तापले आहे. त्याशिवाय सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना, भाजप, काँग्रेस , राष्ट्रवादी या चार प्रमुख पक्षांनी मोठे शक्ती प्रदर्शन करीत आपल्या उमेदवारांचे अर्ज आज दाखल केले.

हेही वाचा-Ashish Shelar Vs Kishori Pednekar : महापौरांची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करा, शिवसेनेसह भाजपचीही तक्रार

महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून बिघाडी..,
प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष वसंतकुमार पानसरे ( Prahar Janshakti Party leader Vasantkumar Pansare ) यांनी शहापूर नगरपंचायतमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा घोषीत केला. तर अर्ज दाखल करण्याच्या काही तासापूर्वी मुरबाड शिवसेना शाखा प्रमुख रामभाऊ दुधाळे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे दोन्ही नगरपंचायतमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना होणार होता. मात्र महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून बिघाडी झाल्याने मुरबाडमध्ये तिन्ही पक्षांनी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. तर शहापूरमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडीकरून आपले आघाडीचे उमेदवार उभे केले आहेत. यामुळे साहजिक याचा फायदा भाजपाला होणार असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा-President Kovind In Maharashtra : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची पुण्याच्या हवाई दल तळाला भेट

दोन्ही नगरपंचायतमध्ये प्रत्येकी चार - चार प्रभागात ओबीसी आरक्षण ..
मुरबाड आणि शहापूर नगरपंचायतमध्ये प्रत्येकी चार-चार प्रभागात ओबीसी आरक्षण असल्याने हे प्रभाग रिक्त ठेवण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या ६ डिसेंबर २०२१ च्या आदेशानंतर दोन्ही नगरपंचायतमधील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणुका आहेत. मात्र, अर्ज दाखल करण्याच्या शेवट्याच्या दिवशी स्थगित करण्यात आल्या आहेत. परंतु अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण जागांसाठीची निवडणूक पूर्व घोषित कार्यक्रमानुसार पुढे सुरू राहील. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग जागांच्या स्थगित निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील आदेशानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असेही दोन्ही नगरपंचायत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Last Updated : Dec 7, 2021, 10:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.