ठाणे - शहरात भोंगे आणि इतर ध्वनीक्षेपक विक्रेते यांना आता ठाणे पोलिसांनी नियम घालून दिलेले आहेत. या नियमांमध्ये हे साहित्य खरेदी करणाऱ्या व्यक्तींची पूर्ण माहिती ओळख पत्र, आधार कार्ड इत्यादींची माहिती ठेवणे बंधनकारक केले आहे. सोबतच हे ध्वनीक्षेपक भोंगे हे घेणाऱ्या संस्था आणि व्यक्ती कोणत्या उद्देशाने ते घेत आहेत, त्याची देखील माहिती पोलिसांना ठेवावी लागणार आहे. या संदर्भात आज (सोमवारी) जिल्हा प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने पत्र काढून याबाबत खुलासा केला आहे.
हेही वाचा - Raj Thackeray Tweet : अक्षय्य तृतीयेला महाआरती करू नका; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन