ETV Bharat / city

दि.बा पाटील नाव : उद्या होणाऱ्या आंदोलनापूर्वी पंचमहाभूत गटाला नोटीस, झाले भूमिगत - Panchmahabhut group underground

आमच्यावर भूमिगत होण्याची वेळ आली आहे, तरी आमची मागणी तीच राहणार. आमची भूमिका बदलणार नाही, नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील हेच नाव दिले पाहिजे, नाही तर आमचे आंदोलन हे उग्र स्वरुपाचे असेल, अशी भूमिका स्थानिक पुत्रांनी म्हणजेच पंचमहाभूत यांनी मांडली आहे.

D.B. Patil name case
दि.बा पाटील नाव प्रकरण
author img

By

Published : Jun 23, 2021, 8:47 PM IST

ठाणे - आमच्यावर भूमिगत होण्याची वेळ आली आहे, तरी आमची मागणी तीच राहणार. आमची भूमिका बदलणार नाही, नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील हेच नाव दिले पाहिजे, नाही तर आमचे आंदोलन हे उग्र स्वरुपाचे असेल, अशी भूमिका स्थानिक पुत्रांनी म्हणजेच पंचमहाभूत यांनी मांडली आहे. सध्या त्यांना पोलिसांकडून नोटीस बजावण्यात येत आहेत, त्यामुळे ते भूमिगत झाले आहेत.

पंचमहाभूत गट सदस्य

हेही वाचा - ठाण्यातील बिवलवाडीत तब्बल ७२ वर्षाने आले नळाला पाणी; महिलांच्या भटकंतीला ब्रेक

पोलिसांकडून भूमिपुत्रांना नोटीस

नवी मुंबईच्या विमानतळाला बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात यावे, अशी मागणी शिवसेना करत आहे. तर, राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे नाव दिले पाहिजे, असे सुचवले, तर विमानतळाला दि.बा. पाटील हेच नाव देण्यात यावे, अशी भूमिका भूमिपुत्रांनी घेतली आहे. भूमिपुत्रांचा एक गट म्हणजेच, पंचमहाभूत गट यांनी ही मागणी धरून ठेवली आहे. याविषयी आता २४ जूनला सिडको या ठिकाणी मोठे आंदोलन करणार असल्याचे पंचमहाभुतांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलिसांकडून या भूमिपुत्रांना नोटीस बजावण्यात आल्या आगेत. त्यामुळे, काही भूमिपूत्र भूमिगत झाले आहेत.

राज ठाकरे यांच्या भूमिकेचे स्वागत

राज ठाकरे यांनी जी भूमिका घेतली, त्याबद्दल आम्ही त्यांचे स्वागत करतो. त्यांनी पाटील यांच्या नावाला विरोध दर्शवलेला नाही, तर ठाकरे यांच्या नावाला समर्थनही दिले नाही. असेही भूमिपुत्रांनी सांगितले. तर या आंदोलनात ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांचे खटले विनाशुल्क लढण्याची तयारी पंचमहाभुतांनी दर्शविली आहे.

पोलिसांचा ससेमिरा सुरू

आमच्यावर भूमिगत होण्याची वेळ आली आहे. मात्र, आमची मागणी तीच आहे. नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील हेच नाव दिले गेले पाहिजे, नाही तर आमचे आंदोलन हे उग्र स्वरुपाचे असेल, अशी भूमिका स्थानिक पुत्रांनी, म्हणजेच पंचमहाभूत यांनी मंडली आहे. सध्या त्यांना पोलिसांकडून नोटीस बजावण्यात येत आहेत, त्यामुळे ते भूमिगत झाले आहेत. उद्याचे आंदोलन हे आम्ही शांत पद्धतीने करणार आहोत, तसे आवाहन आम्ही सर्वांना करत आहोत, असेही पंचमहाभूत मंडळींनी सांगितले.

हेही वाचा - दि.बा.पाटील विमानतळ नाव प्रकरण : 24 जूनच्या कृती समितीच्या आंदोलनाला परवानगी नाकारली

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.