ETV Bharat / city

खून करून फरार झालेले ५ दरोडेखोर पोलिसांच्या तावडीत - दरोडेखोर

मृत चालकाचा सहकारी चालक मोहम्मद अजमल याने ४ जणांच्या साथीने सुभाष यादव याची लोखंडी टॉमीने डोक्यावर व तोंडावर जोरदार प्रहार करून हत्या केल्याची कबुली दिली.

आरोपी
author img

By

Published : Mar 11, 2019, 4:41 AM IST

ठाणे - ट्रक चालकाचा खून करुन फरार झालेल्या ५ दरोडेखोरांना पोलिसांनी अटक केली. खळबळजनक बाब म्हणजे मृत ट्रक चालकाच्या साथीदाराचा या हत्येत सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन झाले आहे.

गुजरात येथून सिमेंट ब्लॉकने भरलेली ट्रक लोणावळा येथे मालाची डिलेव्हरी देण्यासाठी घेऊन जात असताना ५ दरोडेखोरांनी मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील शिरसाड नाका येथून ट्रकचे अपहरण करून ट्रक भिवंडी बायपास येथे घेऊन आले. मात्र त्यावेळी सिमेंट ब्लॉक चोरून विकण्यास ट्रक चालकाने विरोध केल्याने त्याच्या डोक्यावर लोखंडी टॉमी मारून हत्या करणाऱ्या ५ दरोडेखोरांना भिवंडी तालुका पोलिसांनी गजाआड केले.

सुभाष छबिराज यादव ( ४५ रा. परशुरामपूर ,अजमगढ, उत्तर प्रदेश) असे हत्या झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. तर मोहम्मद अजमल उर्फ अकमल वसी अहमद शेख (३६ रा.विकासपाडा, तलासरी) मोहम्मद शाकीर रियाज अहमद शेख (३० रा.गोवंडी) मोहम्मद कैफ अहमद अल्ताफ शेख ( ३३ रा. शांतीनगर ) जहान जेब अमीन खान (२३ रा. गैबीनगर) मोहम्मद इमरान अलील खान (३५ रा. अन्सार नगर) असे हत्येप्रकरणी अटक केलेल्या दरोडेखोरांची नावे आहे. विशेष म्हणजे मोहम्मद अजमल उर्फ अकमल वसी अहमद शेख हा दरोडेखोर मृतक ट्रक चालकाचा साथीदार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई नाशिक महामार्गावरील वडपे बायपास येथील शालीमार हॉटेल समोर २६ फेब्रुवारी २०१९ रोजी एका ट्रक चालकाचा खून करून त्याचे प्रेत कॅबिनमध्ये फेकून आरोपी फरार झाले होते. या घटनेत ट्रक चालक सुभाष छबिराज यादव याची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले. त्याबाबत भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञातांच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तालुका पोलीस ठाण्याचे एपीआय पंकज घाटकर यांनी पोलीस पथकाच्या मदतीने मृत चालकाचा सहकारी चालक मोहम्मद अजमल उर्फ अकमल वसी अहमद शेख यास प्रथम ताब्यात घेऊन चौकशी केली.त्याने अन्य ४ जणांच्या साथीने सुभाष यादव याची लोखंडी टॉमीने डोक्यावर व तोंडावर जोरदार प्रहार करून हत्या केल्याची कबुली दिली.

चालकाच्या हत्येत मोहम्मद शाकीर रियाज अहमद शेख, मोहम्मद कैफ अहमद अल्ताफ शेख, जहान जेब अमीन खान, मोहम्मद इमरान अलील खान आदींनी संगनमताने कट रचून हत्या केली. हे दरोडेखोर फरार झाले होते. पोलिसांनी ५ दरोडेखोरांना अटक करून रविवारी भिवंडी न्यायालयातील न्यायाधीश आर. ए. सावंत यांच्यासमोर उभे केले असता त्यांना १६ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Intro:Body:

खून करून फरार झालेले ५ दरोडेखोर पोलिसांच्या तावडीत

ठाणे - ट्रक चालकाचा खून करुन फरार झालेल्या ५ दरोडेखोरांना पोलिसांनी अटक केली. खळबळजनक बाब म्हणजे मृतक ट्रक चालकाच्या साथीदाराचा या हत्येत सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन झाले आहे.

गुजरात येथून सिमेंट ब्लॉकने भरलेली ट्रक लोणावळा येथे मालाची डिलेव्हरी देण्यासाठी घेऊन जात असताना ५  दरोडेखोरांनी मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील शिरसाड नाका येथून ट्रकचे अपहरण करून ट्रक भिवंडी बायपास येथे घेऊन आले. मात्र त्यावेळी सिमेंट ब्लॉक चोरून विकण्यास ट्रक चालकाने विरोध केल्याने त्याच्या डोक्यावर लोखंडी टॉमी मारून हत्या करणाऱ्या ५ दरोडेखोरांना भिवंडी तालुका पोलिसांनी गजाआड केले.

सुभाष छबिराज यादव ( ४५ रा. परशुरामपूर ,अजमगढ, उत्तर प्रदेश) असे हत्या झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. तर मोहम्मद अजमल उर्फ अकमल वसी अहमद शेख (३६ रा.विकासपाडा, तलासरी) मोहम्मद शाकीर रियाज अहमद शेख (३० रा.गोवंडी) मोहम्मद कैफ अहमद अल्ताफ शेख ( ३३ रा. शांतीनगर ) जहान जेब अमीन खान (२३ रा. गैबीनगर) मोहम्मद इमरान अलील खान (३५ रा. अन्सार नगर) असे हत्येप्रकरणी अटक केलेल्या दरोडेखोरांची नावे आहे. विशेष म्हणजे मोहम्मद अजमल उर्फ अकमल वसी अहमद शेख हा दरोडेखोर मृतक ट्रक चालकाचा साथीदार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई नाशिक महामार्गावरील वडपे बायपास येथील शालीमार हॉटेल समोर २६ फेब्रुवारी २०१९ रोजी एका ट्रक चालकाचा खून करून त्याचे प्रेत कॅबिनमध्ये फेकून आरोपी फरार झाले होते. या घटनेत ट्रक चालक सुभाष छबिराज यादव याची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले.  त्याबाबत भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञातांच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सबळ पुरावा नसल्याने मारेकऱ्यांना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर असताना तालुका पोलीस ठाण्याचे एपीआय पंकज घाटकर यांनी पोलीस पथकाच्या मदतीने मृत चालकाचा सहकारी चालक मोहम्मद अजमल उर्फ अकमल वसी अहमद शेख यास प्रथम ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने अन्य ४ जणांच्या साथीने सुभाष यादव याची लोखंडी टॉमीने डोक्यावर व तोंडावर जोरदार प्रहार करून हत्या केल्याची कबुली दिली.

चालकाच्या हत्येत मोहम्मद शाकीर रियाज अहमद शेख, मोहम्मद कैफ अहमद अल्ताफ शेख, जहान जेब अमीन खान, मोहम्मद इमरान अलील खान आदींनी संगनमताने कट रचून हत्या केली. हे दरोडेखोर फरार झाले होते. पोलिसांनी ५ दरोडेखोरांना अटक करून रविवारी भिवंडी न्यायालयातील न्यायाधीश आर. ए. सावंत यांच्यासमोर उभे केले असता त्यांना १६ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.