ETV Bharat / city

मुजोर रिक्षाचालकांविरोधात ठाणे रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांची कारवाई - ठाणे रेल्वे स्टेशन न्यूज

वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे वाहतूक शाखा, ठाणे नगर पोलीस ठाणे, प्रादेशिक परिवहन विभाग, रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दल यांच्या संयुक्त कारवाईत नियम मोडणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात कारवाईची विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे.

ठाणे रेल्वे स्टेशन
ठाणे रेल्वे स्टेशन
author img

By

Published : Oct 21, 2021, 7:40 PM IST

ठाणे - कोरोनाच्या काळापासून ठाणे स्थानक येथील रिक्षाचालकांच्या विरोधात अनेक तक्रारी येत असून हे रिक्षाचालक अधिकचे भाडेदेखील आकारात होते. तसेच ठाणे स्थानक येथील सॅटिस पुलाखाली रिक्षाचालक अवैधरित्या रिक्षांची पार्किंग करत असल्यामुळे अनेक वेळा स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला प्रवाशांना सामोरे जावे लागत होते. या सर्व समस्यांवर उपाययोजना म्हणून वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे वाहतूक शाखा, ठाणे नगर पोलीस ठाणे, प्रादेशिक परिवहन विभाग, रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दल यांच्या संयुक्त कारवाईत नियम मोडणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात कारवाईची विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे.

66, 600 रुपये इतका दंड वसूल

या कारवाईत रस्ता अडवून रिक्षाचालक वाहतूक कोंडी करत असल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या. तसेच अनेक रिक्षाचालक हे जादा प्रवासी भरणे, जास्त भाडे आकारणे, जवळचे भाडे नाकारणे, गणवेश न घालने, बॅच न घालने, यावरून कारवाई करण्यात आली. कालपासून सुरू असलेला कारवाईमध्ये एकूण 285 रिक्षाचालकांवर कारवाई केली असून जवळपास 66, 600 रुपये इतका दंड यावेळी रिक्षाचालकांकडून आकारण्यात आला. ही कारवाई ठाणे रेल्वे स्थानक परिसरामध्ये करण्यात येत असून पुढील काही दिवस अशीच सुरू ठेवणार असल्याचे यावेळी वाहतूक पोलीस निरीक्षक पांढरे यांनी यावेळी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.