मीरा भाईंदर (ठाणे) - भाईंदर पश्चिमेच्या गणेश गल्लीमधील महेश नगर इमारतीचा काही भाग कोसळला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनास्थळी अग्निशामक दालाच्या जवानांनी धाव घेत तब्बल 72 रहिवाशांना रेस्क्यू केले आहे.
७२ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले -
घटनेची माहिती मिळताच पालिका आयुक्त दिलीप ढोले, सहाय्यक पोलीस आयुक्त शांतीलाल जाधव, स्थानिक पोलीस निरीक्षक मुगुतराव पाटील यांच्यासह मुख्य अग्निशामक अधिकारी प्रकाश बोराडेंनी घटनास्थळी भेट दिली. सदर इमारत खाली करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून बचावकार्य करत ७२ जणांना रेस्क्यू करण्यात आले आहे. इमारतीमध्ये एकूण ३९ सदनिका आहेत. इमारत धोकादायक नसल्याची माहिती पालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी दिली.