ETV Bharat / city

Thane Dahi Handi 2022 ठाण्यातील दहीहंडी उत्सवाची जंगी तयारी, लाखोंची बक्षिसे जाहीर करण्यात राजकीय पक्षांमध्ये स्पर्धा - प्रताप सरनाईक ठाणे दहीहंडी

Thane Dahi Handi 2022 ठाण्यात लागणार रेकॉर्ड ब्रेक हंड्या निवडणुकांपूर्वी सर्वच पक्ष करत आहेत लाखोंच्या बक्षिसाची घोषणा मनसे 55 लाख भाजप 51 लाख सरणाईकांच्या 21 लाखांचे बक्षीस सेनेचेही लाखोंची हंडी लागणार आहे.

Dahi Handi 2002
Dahi Handi 2002
author img

By

Published : Aug 18, 2022, 8:18 AM IST

Updated : Aug 18, 2022, 9:37 AM IST

ठाणे मागील 2 वर्ष दहीहंडीवर कोरोना आणि निर्बंध आले होते. त्यामुळे यंदा राज्य सरकारने दहिहंडीची पंढरी समजल्या जाणाऱ्या ठाण्यात शिवसेना मनसे आणि भाजपसह सर्वच पक्षांच्या हंड्या लागणार आहेत. प्रताप सरनाईक Pratap Sarnaike Dahi handi यांनी रेकॉर्ड ब्रेक करणाऱ्या मंडळाला 21 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहेत, तर भाजपने 51 लाखांची बक्षिसे देणार असल्याचे जाहीर केले आहे. आतापर्यंत सविनय कायदे भंग करणाऱ्या मनसेने आपल्या हंडीचे बक्षीस जाहीर केले आहे. ते ही 55 लाख रुपये त्यांचीही जंगी तयारी सुरू झाली आहे. आता ही बक्षिसे मिळवण्यासाठी राज्यभरातून अनेक मंडळे ठाण्यात येणार आहेत.

ठाण्यातून जगभरात दहिहंडी उत्सव dahi handi festival पोहचवनाऱ्या संघर्ष संस्थेची जितेंद्र आव्हाड यांनी काही वर्षांपासून हंडी बंद केली आहे, पण त्यांच्यामुळेच हंडी जगभरात गेलेली आहे. काही वर्षांपूर्वी संकल्पची दहिहंडी आमदार रविंद्र फाटक लावत होते. खासदार राजन विचारे हे देखील मोठया प्रमाणात दहिहंडीचे आयोजन ठाण्यात करत होते. विचारे यांनी यंदा 5 थरांच्या हंडीसाठी 1 लाख 11 हजार 1111 रुपयांचा बक्षीस लावला आहे. त्यामुळे आपसूकच दहिहंडी उत्सवाला राजकीय रंग चढत असल्याचा अनुभव पहायला मिळत होता. यावर्षीही तोच उत्साह, तोच संघर्ष ठाण्यात पहायला मिळणार आहे. मात्र, येथे राजकिय समिकरण मात्र बदलले आहे. टेंभिनाक्यावर शिंदे समर्थकांची हंडी तर जांभळीनाक्यावर शिवसेनेच्या दहिहंडीचा संघर्ष पेटणार आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दहिहंडीचे आयोजन बंद केला आहे. पण त्यांचे कट्टर विरोधक असलेले आमदार प्रताप सरनाईक यांनी 21 लाखांची संस्कृती प्रतिष्ठानची हंडी यावर्षी उभारली आहे. काही वर्षांपूर्वी सुरू झालेली भाजपच्या स्वामी प्रतिष्ठाननेही गोविंदा उत्सवात जोरदार उडी घेतली असून थेट 51 लाखांची हंडी जाहिर केली आहे.

Dahi Handi 2002

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असणार उपस्थित भाजप नेते शिवाजी पाटील यांच्या स्वामी प्रतिष्ठानने यंदाच्या दहीहंडी उत्सवात 51 लाखांच्या बक्षीसांची घोषणा केली आहे. याशिवाय सामाजिक बांधिलकी जपत ग्रामीण भागातील 75 हजार गरजू महिलांसाठी कँसर तपासणी करण्याचा निर्धार केला आहे. या दहीहंडीचे प्रमुख आकर्षण म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित राहणार आहेत.

ठाण्यात मानाची हंडी आनंद दिघे यांची मानाच्या दहींहंडीत मुंबई, ठाण्याला स्वतंत्र मान आहे. स्वर्गीय आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या टेंभीनाका येथील दहीहंडी उत्सवात मुंबई आणि ठाण्यातील गोविंदा पथकांसाठी दोन स्वतंत्र हंडी उभारण्यात येणार आहे. दोन्ही हंडींसाठी प्रत्येकी 2 लाख 51 हजारांचे पारितोषिक, सन्मान चिन्ह देण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. याशिवाय महिला गोविंदा पथकासाठी 1 लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. 7 थर लावणाऱ्या पथकासाठी 12 हजार, 6 थर लावणाऱ्या 8 हजार, 5 थरासाठी 6 हजार तर 4 थर लावणाऱ्या पथकासाठी 5 हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे पथकाच्या सुरक्षेसाठी रॅपलिंग दोरखंड वापरण्यात येणार असल्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितले.

पालिका निवडणूक महत्वाचे लक्ष अवघ्या काही महिन्यांवर ठाणे महानगरपालिकेची निवडणूक आहे, आणि या निवडणुकीमध्ये सर्वच पक्ष सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. या प्रयत्नांची सुरुवात सणासुदीच्या निमित्तानेच सुरू झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. या निवडणुका महत्त्वाचा रोल निभवणाऱ्या युवकांना आकृष्ट करण्यासाठी दहीहंडीच्या सणावर सर्वच राजकीय पक्ष लाखो रुपये खर्च करत आहेत. याचे एकमेव कारण हे आगामी महानगरपालिका निवडणुका हेच आहे.

10 लाखांचा विमा आणि खेळात झाला आहे समावेश राज्य सरकारने या खेळामध्ये सहभागी होणाऱ्या मंडळांमधल्या सर्व सदस्यांना 10 लाखांच्या विम्याचे कवच जाहीर केलेले आहे. यासोबत हा खेळ सहासी खेळामध्ये देखील समाविष्ट झालेला आहे, असे असताना या खेळावर असलेले काही निर्बंध पाळले जातील का ? याकडे दुर्लक्ष होईल. आता यावरच सामाजिक संस्थांचे लक्ष असणार आहे. कारण 14 वर्षाखालील गोविंदांना या खेळात सहभागी करू नका असे निर्बंध आजही या खेळावर आहेत.

खेळाचा दर्जा दिला अपघात नको दहीहंडी खेळाच्या विरोधामध्ये अनेक वर्ष याचिका दाखल करून लढाई लढणारे सामाजिक कार्यकर्ते महेश बेडेकर यांनी या संपूर्ण विषयावर आपलं मत मांडताना या खेळाला मैदानातच खेळले गेले पाहिजे. रस्त्यावर नको आणि या खेळामध्ये कोणीही जखमी होऊ नये. यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशी मागणी केली. राज्य सरकारने 10 लाखाचा विमा कवच दिलेला आहे. मात्र या विमा कामाची गरज न पडता योग्य रीतीने हा खेळ खेळला गेला तर दुर्घटना टाळता येऊ शकतात असे आवाहन देखील महेश बेडेकर यांनी केले आहे.

हेही वाचा - Ajit Pawar सिंचन घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाकडून अजित पवारांना क्लीनचिट नाही

Last Updated : Aug 18, 2022, 9:37 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.