ठाणे - केनियाहून उल्हासनगरमध्ये आलेल्या एका कुटुंबाची कोरोनाची चाचणी केली होती. त्यानुसार रिपोर्ट येईपर्यत घरीच राहण्याचा सल्ला महापालिका आरोग्य पथकाने दिली होता. तीन दिवसात या कुटुंबातील तीन जणांना ओमायक्रॉन लागण झाल्याचे निष्पन्न ( Omicron Positive Family gone Tour ) झाले. त्यातच हे कुटुंब सहलीला गेल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेने उल्हासनगर शहरात खळबळ माजली आहे.
...मात्र कुटुंब सर्वत्र मज्जा करीत फिरत होते -
केनियाहुन १७ डिसेंबर रोजी उल्हासनगरमध्ये राहणारे चार जणांचे एक कुटुंब आले होते. त्यांनतर २१ डिसेंबर रोजी या चारही प्रवासी चौघांची उल्हासनगर महापालिकेच्या आरोग्य पथकाने आरटीपीसीआर चाचणी केली होती. कोरोनाच्या नियमानुसार आरटीपीसीआर चाचणी रिपोर्ट येईपर्यंत या कुटुंबाने घरात राहणे आणि शहरात थांबणे अनिवार्य असताना हे कुटुंब घरात न थांबता काश्मीर, वैष्णोदेवी आणि अमृतसर येथे सहलीसाठी गेले. मात्र त्या वेळेत या चार जणांपैकी तिघांचा आरटीपीसीआर चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊन ओमायक्रॉन रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे महापालिका वैद्यकीय अधिकारी या कुटुंबातील पॉझिटिव्ह रुग्णांना क्वॉरंटाईन करण्यास गेले असता ते कुटुंब सहलीसाठी गेले असल्याचे दिसल्याने महापालिका यंत्रणा हादरली. लागलीच फोन करून या कुटुंबाला जेथे आहे. त्या शहरात क्वॉरंटाईन होण्यास सांगितले होते मात्र हे कुटुंब सहलीला सर्वत्र फिरत मज्जा करीत होते.
कुटूंबातील प्रमुखाविरोधात गुन्हा दाखल -
३१ डिसेंबर रोजी उल्हासनगरला पुन्हा घरी आले. कोरोना आणि ओमायक्रॉन या रोगाच्या नियम अटींबाबत या कुटुंबाने हलगर्जीपणा आणि नियमांचे पालन केल्याने आज उल्हासनगरमधील शासन नियमांच्या अटी शर्ती भंग केल्याबद्दल उल्हासनगर महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त अजित गोवारी यांनी या कुटूंबातील प्रमुखाविरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.