नवी मुंबई - नवी मुंबईमधील दोन विद्यार्थिनींनी सीबीएसई दहावीच्या परीक्षेत प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. कोपरखेरनेमधील रिलायन्स फाउंडेशनच्या स्कूलमधील धात्रा मेहता हिने ५०० पैकी ४९७ गुण मिळविले आहेत. नेरुळ एपीजे स्कूलची विद्यार्थीनी दीपस्मा पांडा हिने ४९७ गुण मिळविले आहेत.
धात्रा हिने कोणताही क्लास न लावता फक्त नियमित अभ्यास करून यश मिळविले आहे. अभ्यासासाठी सराव पेपर सोडविल्याचे तिने सांगितले. शाळेच्या शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाल्याचे धात्रीने सांगितले. ध्यानधारणा आणि कुंफू कराटेमुळे अभ्यासात एकाग्रता करणे शक्य झाल्याचे तिने सांगितले. धात्रीला विज्ञान, गणित, संस्कृत आणि सामाजिक शास्त्रामध्ये १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत. कोणताही ताण-तणाव न घेता परीक्षा देण्याचा सल्ल्ला धात्री हिने दिला आहे.
दीपस्मा पांडा हिने विज्ञान, गणित आणि संस्कृत विषयात १०० गुण मिळाले आहेत. शाळेत नेहमी टॉपर असलेल्या दीपस्माने स्वतःचे असे वेळापत्रक आखले होते. तसेच तिने छंदही जोपासले आहेत.