ठाणे - जेव्हा एखादा प्रामाणिक अधिकारी गुन्हे रोखण्याचा मनापासून विचार करतो तेव्हा त्याला ते शक्य असते. पण हे काम करण्याची इच्छाशक्ती ही खूप महत्त्वाची असते. ठाण्यातील मुंब्रा पोलीस ठाण्यात नव्याने नियुक्त झालेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांनी गुन्हे रोखण्यासाठीची सुरवात या भागात मिळणाऱ्या नशेच्या पदार्थांवर आणि नशेडींवर पोलिसांनी कारवाई करत 8 नशेडींची धिंड काढत लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Mumbra Police Action) काल रात्री सोमवार (दि. 4 एप्रिल)रोजी उशिरा एक किलो गांजा आणि 15 कोरेक्स च्या बॉटल जप्त करत नशा केलेल्या 8 जणांना ताब्यात घेऊन रशीद कंपाऊंड भागात मुंब्रा पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईच्या वेळी नागरिकांनी पोलिसांचे टाळ्या वाजवून कौतुक देखील केले आहे.
रात्री उशिरा एक किलो गांजा आणि 15 कोरेक्स च्या बॉटल जप्त - मुंब्रा हा परिसर मुस्लिम बहुल परिसर आहे या भागात गुटका चरस गांजा एमडी हे सहज रित्या उपलब्ध होते. म्हणूनच या भागात गुन्हेगारीचे प्रमाण ही मोठ्या प्रमाणात आहे. या मुंब्रा पोलीस ठाण्यात आतापर्यंत अनेक अधिकारी काम करून गेले. परंतु, आता ठाण्याचा इतिहास भूगोल माहिती असलेल्या अशोक कडलग यांनी नियुक्ती झाल्यापासून या परिसराचा चांगला अभ्यास करून कारवाईचा धडाका सुरू केला आहे. काल रात्री उशिरा एक किलो गांजा आणि 15 कोरेक्स च्या बॉटल जप्त करत नशा केलेल्या 8 जणांना ताब्यात घेऊन रशीद कंपाऊंड भागात मुंब्रा पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईच्या वेळी नागरिकांनी पोलिसांचे टाळ्या वाजवून कौतुक देखील केले आहे.
लाखोंचा मुद्देमाल जप्त अनेक ठिकाणी कारवाई - मुंब्रा भागात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांनी 10 लाखांचा गुटखा जप्त केला. तर, दुसऱ्या कारवाईत 55 ग्राम एमडी जप्त केले आहे. तिसऱ्या कारवाईत तर त्यांनी मुंब्रा भागात चालणारा मटका कारवाई करून बंद केला आहे. या धडाकेबाज कारवाईनंतर नशेडींची काढलेली वरात हे अशा प्रवृत्तीनवर दहशद निर्माण करणारी आहे. या सर्व कारवायांचे मुंब्रा येथील नागरिकांनी कौतुक केले असून यामुळे मुंब्रा भागातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी मदत होणार असल्याचे सांगितले आहे.
हेही वाचा - Police Custody Deaths : कोठडीतील आरोपींचे मृत्यू! महाराष्ट्र 1 नंबर; गुजरात दुसऱ्या क्रमांकावर