ETV Bharat / city

Fake marriage certificate : बारबलेचा प्रताप; बनावट विवाह प्रमाणपत्राच्या आधारे कोटींची मालमत्ता हडप

मालमत्ता हडपण्यासाठी प्रेमसंबंध असलेल्या तरुणाच्या मृत्यूनंतर विवाह झाल्याचे बनावट प्रमाणपत्र ( Fake marriage certificate after death ) बनवून वारसाहक्क लावीत 19 कोटी 70 लाखाची मालमत्ता हडप केल्याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाने आरोपींना अटक केले. ( Anti extortion squad arrested the accused )

Fake marriage certificate
बनावट विवाह प्रमाणपत्र
author img

By

Published : Oct 7, 2022, 1:20 PM IST

ठाणे : मालमत्ता हडपण्यासाठी प्रेमसंबंध असलेल्या तरुणाच्या मृत्यूनंतर विवाह झाल्याचे बनावट प्रमाणपत्र ( Fake marriage certificate after death ) बनवून वारसाहक्क लावीत 19 कोटी 70 लाखाची मालमत्ता हडप केल्या प्रकरणी खंडणी विरोधी पथकाने ( Anti extortion squad arrested the accused) आरोपी असलेली बारबाला अंजली अग्रवाल आणि तिचे दोन सहकारी थॉमस गोडपवार, महेश काटकर यांना 3 ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी अटक केली. न्यायालयाने त्यांना 7 ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

बनावट विवाह प्रमाणपत्र

नेमकी हकीकत काय : तक्रारदार सुरेखा पापडे यांच्या तक्रारीने उघडकीस आला आहे. नौपाडा पोलीस ठाण्यात 16 मे रोजी गुन्हा दाखल झाला. सदर गुन्ह्याचा तपास खंडणी विरोधी पथक करीत होते. आरोपी अंजली अग्रवाल हिच्या मोबाईलचा तांत्रीक अभ्यास करीत पोलीस पथकाने सोमवारी अटक केली. तिने दिलेल्या माहितीवरून तिचे सहकारी आरोपी थॉमस गोडपवार, महेश काटकर यांनाही अटक करून न्यायालयात नेले असता त्यांना 7 ऑक्टोंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. याबाबतची हकीकत अशी कि, तक्रारदार यांचा मुलगा अनिल पापडे याचे आरोपी अंजली अग्रवाल याच्याशी प्रेमसंबंध होते. अनिलचा 23 नोव्हेंबर, 2021 रोजी मृत्यू झाल्यानंतर संधी साधत आरोपी अंजली आणि तिचे दोन सहकारी यांनी बनावट विवाह प्रमाणपत्र तयार केले. मृत अनिलच्या वारसाहक्काच्या मालमत्तावर वारसाहक्क लावला आणि ठाण्यातील तीन फ्लॅट, मयताचे नावे असलेली कावेसर येथील मोकळी जागा, सोन्या चांदीचे दागिने अशी १९.७० कोटीची स्थावर व जंगम मालमत्ता हडप केली.

चौकशीत खरा प्रकार पडला बाहेर : सदर प्रकरणी तक्रारदार सुरेख पापड यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर चौकशीत खरा प्रकार बाहेर पडला. नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर खंडणी विरोधी पथकाने श्रीमती अंजली घनश्याम अग्रवाल वय ३० राहणार नौपाडा, ठाणे, थॉमसर रामुल गोडपवार वय ५० व्यवसाय चर्च मध्ये, महेश गणेश काटकर वय ३७ राहणार बाळकुम, ठाणे याना अटक केली. न्यायालयाने त्यांना ७ /१०/२०२२ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत.

आईच्या तक्रारीनंतर कारवाई : या प्रकाराची उकल अनिल पापडे याच्या आईने दिलेल्या पोलीस तक्रारी नंतर झाली आहे पोलिसांनी सुरवातीला प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन प्रकरण खंडणी विरोधी पथकाकडे वर्ग केले आणि मग या प्रकरणाचा छडा लागला आहे मालमत्ता हडपण्यासाठी लग्नाचे खोटे प्रमाणपत्र ही बनवण्यात आले आहे आणि हे प्रमाणपत्र दिल्याने ते बनवणार्या फादर ला ही या गुन्ह्यात सह आरोपी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.