ETV Bharat / city

प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई करा; किरीट सोमैया यांची पालिका आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांडे मागणी - Vihang Garden construction in Thane

शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या विहंग गार्डन बांधकाम करावी, अशी मागणी किरीट सोमैया यांनी ठाणे मनपा आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याकडे केली. शर्मा आणि सोमैया यांच्याममध्ये तब्बल एक तास चर्चा झाली.

किरीट सोमैय्या व इतर
किरीट सोमैय्या व इतर
author img

By

Published : Dec 24, 2020, 7:18 PM IST

Updated : Dec 24, 2020, 7:45 PM IST

ठाणे- शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या विहंग गार्डन या अनधिकृत बांधकाम विरोधात ठाणे महापालिकेने गेली 13 वर्ष कारवाई का केली नाही, असा प्रश्न भाजपचे नेते किरीट सोमैया यांनी उपस्थित केला आहे. याप्रकरणी सोमैया यांनी ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची भेट घेतली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत सरनाईक यांच्यावर कारवाईची मागणी सोमैय्या यांनी केली आहे.

शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या विहंग गार्डन बांधकाम करावी, अशी मागणी किरीट सोमैया यांनी ठाणे मनपा आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याकडे केली. शर्मा आणि सोमैया यांच्याममध्ये तब्बल एक तास चर्चा झाली. पालिका अधिकरी यांची चौकशी व्हावी, अशीही सोमैया यांनी आयुक्त शर्मा यांच्याकडे मागणी केली आहे.

प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई करा

हेही वाचा-प्रताप सरनाईक घोटाळेबाज.. दम असेल तर अब्रूनुकसानीचा दावा दाखल कराच, सोमैया यांचे आव्हान

महापालिका आयुक्तांकडे सरनाईक यांच्या इमारतीविरोधात तक्रार-

ठाण्यातील रेमंड्स कंपनीसमोर 13 मजल्याची विहंग गार्डन हे या दोघांमधील वादाचे मूळ कारण आहे. ही इमारत प्रताप सरनाईक यांनी अनधिकृतरित्या बांधल्याचा आरोप सोमैया यांनी केला आहे. ही इमारतीला अनधिकृत असल्याचा दावाही त्यांनी केला. मनपाने परवानगीचे पत्र दिले नसताना सरनाईक यांनी सदनिका विकून ठाणेकरांची फसवणूक केल्याने त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तक्रार सोमय्या यांनी केली आहे. या प्रकरणासंदर्भात काही दिवसांपूर्वी भाजप नेते सोमैय्या यांनी वर्तकनगर पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली होती. ठाणे महापालिकेनेदेखील या घोटाळ्यातील संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवार कारवाई करावी, यासाठी सोमय्या हे पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना भेटण्यासाठी ठाणे महापालिकेत आले होते. पालिका आयुक्तांना निवेदन देताना भाजप आमदार निरंजन डावखरे, ठाणे पालिकेचे भाजप गट नेते संजय वाघुले उपस्थित होते.

हेही वाचा-'आमदार प्रताप सरनाईकांनी घोटाळ्यातील रक्कमेतून ७८ एकर जमीन केली खरेदी'

जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी-

नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेड या कंपनीने ग्राहकांना हजारो कोटींचा गंडा घातला होता. त्या घोटाळ्यातदेखील प्रताप सरनाईक यांचा सहभाग असल्याचे सांगत सोमैया यांनी दुपारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. जमीन घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी, असे निवदेन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. आमदार प्रताप सरनाईक प्रकरणात आणखी आक्रमक भूमिका घेणार असल्याचे किरीट सोमैया यांनी सांगितले.

दोन्ही नेत्यांमध्ये वाद टोकाला-

भाजपचे माजी खासदार किरीट सोमैया आणि ठाण्यातील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यातील वाद शमण्याचे कोणतेच चिन्ह दिसून येत नाहीत. गेले अनेक दिवस या दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यामुळे ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.

Last Updated : Dec 24, 2020, 7:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.