ETV Bharat / city

डोंबिवलीतील गीतांजली सलूनच्या डिस्प्ले बोर्डाला भीषण आग; रुग्णांचे हाल - मानपाडा

चार रस्ता येथील गीतांजली सलूनच्या डिस्प्ले बोर्डाला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. त्यामुळे खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना आगीच्या धुराचा त्रास सहन करावा लागला.

आग
author img

By

Published : Apr 12, 2019, 7:30 PM IST

ठाणे - डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा रोडवरील चार रस्ता येथील गीतांजली सलूनच्या डिस्प्ले बोर्डाला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीमुळे दुसऱ्या मजल्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना आगीच्या धुराचा त्रास सहन करावा लागला. दरम्यान नुकत्याच शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाला एका दुकानात हलवण्यात आले.

आग

मानपाडा रोडवरील गीतांजली सलूनच्या डिस्प्ले बोर्डाला शुक्रवारी दुपारी साडेआकराच्या सुमारास आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली. या आगीमुळे नागरिकांनी रस्त्यावर मोठी गर्दी करून वाहतूक कोंडी केली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने अग्निशामक दलाला घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल होऊन झाल्या. अग्निशमन विभागाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील खासगी रुग्णालयात एका रुग्णांचे नुकतेच ऑपरेशन झाले होते. त्या रुग्णाला आगीच्या धुराचा त्रास होऊ नये, म्हणून इमारतीच्या तळ मजल्यावरील एका दुकानात हलविण्यात आले. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Intro:किट नंबर 319
कल्याण

Body:डोंबिवलीतील गीतांजली सलूनच्या डिस्प्ले बोर्डाला भीषण आग; आगीमुळे रुग्णांचे हाल

ठाणे :- डोंबिवली पूर्व कडील मानपाडा रोडवरील चार रस्ता येथील गीतांजली सलूनच्या डिस्प्ले बोर्डाला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली आहे या आगीमुळे दुसऱ्या मजल्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना आगीच्या धुराचा त्रास सहन करावा लागला आहे,

विशेष म्हणजे या आगीची झळ रुग्णांना बसू नये म्हणून त्यांना इमारतीच्या एका दुकानात तात्काळ हलवण्यात आले होते, सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही. मात्र मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे

मानपाडा रोड वरील गीतांजली सलूनच्या डिस्प्ले बोर्डाला शुक्रवारी दुपारी साडे अकराच्या सुमारास अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती या आगीमुळे नागरिकांनी रस्त्यावर मोठी गर्दी करून वाहतूक कोंडी केली होती, काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने अग्निशामक दलाला संपर्क करून घटनेची माहिती देण्यात आली, माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले, तर इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर एका खाजगी रुग्णालयात एका रुग्णांचे नुकतंच ऑपरेशन झाले होते, त्या रुग्णाला आगीच्या धुराचा त्रास होऊ नये म्हणून इमारतीच्या तळ मजल्यावरील एका दुकानात हलविण्यात आले होते,

ftp ,, dombivali tayar vis 12.4.19

Conclusion:डोंबिवली आग
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.