ठाणे - जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांना रमजानच्या सनानिमित्त शुभेच्छा देत असतानाच घरीच सण साजरा करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. तसेच मागील महिनाभरापासून गरजू असणाऱ्या 35 हजाराहून अधिक व्यक्तींना त्यांनी अन्न पुरवठा केलेले आहे.
त्यात रस्त्यावरील बेघर, अंध ,अपंग यांनादेखील जिल्ह्यातील विविध भागात अन्नाचे वाटप करण्यात येत आहे. त्याच बरोबर मोल मजूरी करणाऱ्या नागरिकांना देखील जीवनावश्यक वस्तूंच वाटप करण्यात येत असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.