मीरा भाईंदर - मिरारोड मध्ये अंमली पदार्थ चरस विक्री करण्यास आलेल्या एका युवकाला काशीमीरा पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये ७२ ग्राम बाजारभाव प्रमाणे ५४ हजाराचा चरस जप्त करण्यात आले आहे.
५४ हजाराचा चरस जप्त
पश्चिम द्रुतगती मार्गावरील प्युमा शोरूम जवळ एक व्यक्ती चरस विक्री करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचला आणि सेनवाद दिन मोहम्मद लखाणी या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला ७२ ग्रॅम चरस आढळून आले आहे. याची बाजारभावप्रमाणे ५४ हजार रुपये इतकी किंमत आहे. यामध्ये घटनास्थळी मोहम्मद अनिस अबबुर रहमान,जय हरीश सोमय्या यांना ताब्यात घेण्यात आले. यात जय हरीश सोमय्या हा आंतरराष्ट्रीय पातळीवर चरस या अंमली पदार्थांची तस्करी करतो. काशीमिरा पोलिसांनी तिघांन विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे.
हेही वाचा - मैत्रिणीला ज्यूसमधून गुंगीचे औषध देऊन बलात्कार.. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार