ETV Bharat / city

Crime: पैशाचा पाऊस पाडण्याच्या आमिषाने 56 लाखांची फसवणूक; तीन जणांना ठोकल्या बेड्या

आम्ही पैशांचा पाऊस पाडतो. तुम्ही ५६ लाख रुपये तयार ठेवाल, तर ५० कोटी रुपये नोटांचा पाऊस पाडून दाखवू,’ असे भोंदूबाबासह पाच जणांच्या टोळक्याने डोंबिवलीतील ( Dombivali ) एका बांधकाम विकासकाचे पूजेत ठेवलेले ५६ लाख घेऊन पसार झाले होते. टोळीतील भोंदूबाबासह तीन आरोपींना मानपाडा पोलिसांनी ( Manpada police ) बेड्या ठोकल्या आहेत.

Dombivali  Crime
डोंबिवली
author img

By

Published : Jun 28, 2022, 5:38 PM IST

ठाणे - आम्ही पैशांचा पाऊस पाडतो. तुम्ही ५६ लाख रुपये तयार ठेवाल, तर ५० कोटी रुपये नोटांचा पाऊस पाडून दाखवू,’ असे भोंदूबाबासह पाच जणांच्या टोळक्याने डोंबिवलीतील ( Dombivali ) एका बांधकाम विकासकाचे पूजेत ठेवलेले ५६ लाख घेऊन पसार झाले होते. टोळीतील भोंदूबाबासह तीन आरोपींना मानपाडा पोलिसांनी ( Manpada police ) बेड्या ठोकल्या आहेत. अशोक गायकवाड, रमेश मोकळे, आणि भोंदूबाबा महेश गुरुजी असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. तर शर्मा आणि गणेश हे दोघे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

आरोपी टोळीने चमत्कारी बाबा असल्याचे भासवले - सुरेंद्र पांडुरंग पाटील ( वय - ५१, रा. चोळेगाव, ठाकुर्ली ) हे बांधकाम विकासक आहेत. त्यांचे डोंबिवली पूर्वेकडील दावडी येथील पाटीदार भवन शेजारी श्री एकविरा स्वप्ननगरी इमारत येथे कार्यालय आहे. तेथे जवळच निवासाचीही व्यवस्था आहे. गेल्या महिन्यात विकासक सुरेंद्र पाटील यांना महेश या भोंदूबाबाने संपर्क करून, आपल्याकडे पैशाचा पाऊस पाडणारी काही चमत्कारी बाबा असल्याचे सांगितले होते. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन आपण नोटाचा पाऊस पाडून घेण्यास इच्छुक असल्याचे पाटील यांनी आरोपी महेशला सांगितले होते. त्यानंतर आरोपी महेशने भोंदूबाबा असलेल्या ठाण्यातील अशोक शंकर गायकवाड याच्याशी पाटील यांची ओळख करून दिली. त्यामुळे भोंदूबाबा अशोक नियमित पाटील यांच्या कार्यालयात येत होता. अशोकने आपला परिचित चमत्कारी बाबा रमेश मोकळे ( रा. कसारा ) हे पैशांचा पाऊस पाडतो, असे सांगून आरोपी गणेश यासाठी मदत करतील असे सांगितले होते. त्यानंतर गणेश या ढोंगी बुवाने पाटील यांना ५६ लाख रुपये पूजेसाठी खर्च केले, तर ५० कोटी रुपये नोटांचा पाऊस पडेल, असे सांगितले.

पूजेसाठी दागिने गहाण ठेवून आणली होती रक्कम - पाटील यांनी या टोळक्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. ५६ लाख रुपयांची तजवीज करण्यासाठी घरातील सोने कल्याणमधील पारस जवाहिऱ्याकडे पाटील यांनी गहाण ठेवले. तर ठरवलेल्या प्रमाणे आरोपी गणेश धार्मिक विधी करणार होता. त्यामुळे आरोपी गणेशने पूजा साहित्याची यादी पाटील यांना दिली.

इमारतीला प्रदक्षिणा मारण्याची थाप मारून आरोपी पळाले - शनिवारी २५ जून रोजी सकाळी कार्यालयात पाटील यांना पूजेसाठी येण्यास सांगितले. त्यानुसार सकाळी पाटील आणि त्यांचा चालक आशीष शर्मा हे सकाळी साडे पाच वाजता पोहचले. त्यावेळी पूजेसाठी आरोपी गणेश, शर्मा गुरूजी, अशोक गायकवाड कार्यालयात उपस्थित होते. त्यानंतर कार्यालयावरील पाटील यांच्या घरात भोंदूबाबा पूजा मांडली. ५६ लाखाचा बटवा कुठे ठेवला आहे, याची खात्री पाटील यांच्याकडून करून घेतली. शनिवारी सकाळी सव्वा सहा वाजता पूजा सुरू झाली. सव्वा आठ वाजता पूजा संपल्यानंतर आरोपी गणेश, शर्मा गुरुजींनी पाटील यांना बाजुच्या खोलीत ध्यान मग्न होऊन जप करण्यास सांगितले. पाटील जपाला बसताच या टोळक्याने ५६ लाखाची रोकड गुपचूप काढून घेतली. इमारतीखाली जाऊन पूजा विधी आणि प्रदक्षिणा मारून येतो, असे सांगून पाचही आरोपी पळून गेले. बराच उशीर झाला तरी गुरूजी व त्याचे सहकारी पूजेच्या ठिकाणी येत नाहीत. म्हणून पाटील यांनी परिसरात शोध घेतला. ते दिसून आले नाहीत. त्यामुळे संशय आल्याने पाटील यांनी घरात येऊन पाहिले तर ५६ लाखाची पूजेत ठेवलेली रोकड गायब झाली होती.

पोलीसात तक्रार दिल्यानंतर आला प्रकार समोर - नोटांचा पाऊस पाडण्यासाठी पूजापाठ करण्यासाठी आलेल्या ढोंगी बुवांच्या टोळीने आपणास फसविले आहे. हे लक्षात आल्यावर पाटील यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी भादंवि कलम ४२० सह अंधश्रध्दा निर्मूलन कायद्याने, नरबळी कायद्याने गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला असता २४ तासातच तीन आरोपी अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

हेही वाचा- Rebel MLA Eknath Shinde : आम्ही लवकरच मुंबईत परतणार - एकनाथ शिंदे

हेही वाचा- ED second summon to Sanjay Raut : संजय राऊत यांना ईडीची पुन्हा नोटीस, एक जुलैला चौकशीसाठी बोलावले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.