ETV Bharat / city

धावत्या लोकलमधून पडून टीसीचा मृत्यू

आज सकाळी कसाराहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका लोकल प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे तिकीट तपासणीचे काम करीत होते. तपासणी करीत असताना अचानक त्यांचा तोल जावून धावत्या लोकलमधून खाली पडून गंभीर जखमी झाले. शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, येथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

टीसी
author img

By

Published : Feb 15, 2019, 5:40 PM IST

ठाणे - धावत्या लोकलमधून पडून एका रेल्वे तिकीट तपासणीसचा (टीसी) मृत्यू झाला. ही घटना कल्याण-कसारा लोहमार्गावरील उंबरमाळी रेल्वे स्थानकानजीक घडली आहे. अरुण गायकवाड, असे लोकलमधून पडून मृत्यू झालेल्या टीसीचे नाव आहे.

लोकल प्रवास
undefined

मध्य रेल्वेच्या कल्याण विभागात अरुण गायकवाड हे तिकीट तपासणीस म्हणून कार्यरत होते. आज सकाळच्या सुमाराला ते कसाराहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका लोकल प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे तिकीट तपासणीचे काम करीत होते. उंबरमाळी रेल्वे स्थानकानजीक दरवाज्यात उभे असलेल्या प्रवाशाचे तिकीट तपासणी करीत असताना अचानक त्यांचा तोल जावून धावत्या लोकलमधून खाली पडून गंभीर जखमी झाले. ही घटना कसारा व खर्डी दरम्यान कार्यरत असलेल्या लोहमार्ग पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेवून उपचारासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, येथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, कल्याण लोहमार्ग पोलिसांना या घटनेची अद्यापही सविस्तर माहिती मिळत नसल्याने त्यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली नसल्याचे सांगण्यात आले.

धावत्या लोकल मधून पडून टीसीचा मृत्यू

ठाणे :- धावत्या लोकल मधून पडून एका रेल्वे तिकीट तपासणी (टीसी) चा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हि घटना कल्याण – कसारा लोहमार्गावरील उंबरमाळी रेल्वे स्थानकानजीक घडली आहे. अरुण गायकवाड असे लोकल मधून पडून मृत्यू झालेल्या टीसीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मध्य रेल्वेच्या कल्याण डिव्हिजनमध्ये मृतक अरुण गायकवाड हे तिकीट तपासणीस म्हणून कार्यरत होते. आज सकाळच्या सुमाराला ते कसाराहून मुंबईच्या दिशेने  जाणाऱ्या एका लोकल प्रवास करणाऱ्या  प्रवाशांचे तिकीट तपासणीचे काम करीत होते. अकरा ते साडे अकरा वाजल्याच्या सुमारास उंबरमाळी रेल्वे स्थानकानजीक दरवाज्यात उभे असलेल्या प्रवाशाचे तिकीट तपासणी करीत असताना अचानक त्यांचा तोल जावून धावत्या लोकल मधून खाली पडून गंभीर जखमी झाले. हि घटना कसारा व खर्डी दरम्यान कार्यरत असलेल्या लोहमार्ग पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेवून उपचारासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र येथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, कल्याण लोहमार्ग पोलिसांना या घटनेची अद्यापही सविस्तर माहिती मिळत नसल्याने त्यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली नसल्याचे सांगण्यात आले. मात्र या घटनेमुळे मध्य रेल्वेच्या कल्याण विभागातील रेल्वे तिकीट तपासणी (टीसी) संघटनेमध्ये शोककळा पसरली आहे.  

I’m protected online with Avast Free Antivirus. Get it here — it’s free forever.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.