ETV Bharat / city

लसीचा एकही डोस न घेतलेल्या नागरिकांना टीएमटी बसमध्ये 'No Entry', ठाणे पालिकेचा महत्वपूर्ण निर्णय

ठाण्यातून कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी महापालिका प्रशासन प्रभावीपणे व्यापक मोहीम राबवित आहे. लस हा एकमेव उपाय असून ज्यांनी लस घेतली नाही त्यांच्या माध्यमातून इतर नागरिकांना प्रादुर्भाव होवू शकतो, या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बसमध्ये लसीचा एकही डोस न घेतलेल्या प्रवाशांना प्रवेश दिला जाणार नसल्याचा महत्वपूर्ण निर्णय महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी घेतला आहे.

Thane Municipal Corporation
Thane Municipal Corporation
author img

By

Published : Nov 16, 2021, 5:28 PM IST

Updated : Nov 16, 2021, 5:42 PM IST

ठाणे - ठाण्यातून कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी महापालिका प्रशासन प्रभावीपणे व्यापक मोहीम राबवित आहे. लस हा एकमेव उपाय असून ज्यांनी लस घेतली नाही त्यांच्या माध्यमातून इतर नागरिकांना प्रादुर्भाव होवू शकतो, या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बसमध्ये लसीचा एकही डोस न घेतलेल्या प्रवाशांना प्रवेश दिला जाणार नसल्याचा महत्वपूर्ण निर्णय महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार आहे, असे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

लस न घेतल्या नागरिकांना टीएमटीमध्ये प्रवेश नाही
जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून कोविड-19 ची संभाव्य तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सद्यस्थ‍ितीत लस हाच एकमेव उपाय असून सर्वत्र लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. ठाण्यात देखील लसीकरण मोहीम सुरु असून जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे व एकमेकांपासून दुसऱ्याला संसर्ग होवू नये यासाठी खबरदारी म्हणून लसीकरणाचा किमान एक डोस घेतलेल्या नागरिकांना टीएमटी बसमध्ये प्रवेश देण्यात येईल असे महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितले आहे. यासाठी नागरिकांनी लसीकरणाचा एक किंवा दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र किंवा युनिव्हर्सल पास जवळ बाळगणे गरजेचे आहे. मागील काही दिवसांमध्ये लसीकरणाला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे, महापालिकेच्या माध्यमातून यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
लसीकरण वाढीसाठी हा प्रयत्न -आज सर्वत्र लसीकरण केंद्रे उपलब्ध आहेत. 'जम्बो लसीकरण मोहीम', 'लसीकरण ऑन व्हील' तसेच नुकतेच 'हर घर दस्तक' हा उपक्रम देखील सुरू करण्यात आला आहे. तरी ठाण्यातील नागरिकांनी लसीकरणाच्या अफवांवर विश्वास न ठेवता नि:संकोचपणे लसीकरण करुन घ्यावे व स्वत:सह आपले कुटुंब व आपले शहर सुरक्षित ठेवण्यास सहकार्य करावे, असे आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी केले आहे. तर ठाणेकरांनी या निर्णयाला विरोध केला असुन आधीच लोकलमध्ये प्रवेश मिळत नाही आणि आता बस सेवेत असे नियम लावले तर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गैरसोय होईल. त्यामुळे घेतलेल्या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा अशी मागणी ठाणेकर नागरिकांनी केली आहे.

Last Updated : Nov 16, 2021, 5:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.