ठाणे - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा खास मानल्या जाणाऱ्या तारिक अब्दुल करीम मर्चंटला २२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तारिक अब्दुल करीम मर्चंटला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली होती. शनिवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने त्याला 22 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, याच प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंगही आरोपी आहेत. अशी मााहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे.
22 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी -
तारिक अब्दुल करीम मर्चंटला शनिवारी अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने त्याला 22 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ठाणे नगर पोलीस ठाण्यात एका व्यावसायिकाकडून 20 लोकांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ज्यामध्ये तारिकचे नाव होते.