ठाणे : लॉकडाऊनमुळे ४ ते ५ महिने बंद असलेल्या मेल - एक्स्प्रेससह लोकलसेवा रेल्वे प्रशासनाने कोरोना काळात सुरु केल्या आहेत. मात्र याही काळात लांब पल्ल्याच्या मेल - एक्स्प्रेससह लोकलमध्ये फुकटचा प्रवास करणाऱ्या तब्बल ४३ हजार ५१६ प्रवाशांकडून एकूण दीड कोटींचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळ व उपनगरी लोकल सेवा विविध पक्षांच्या मागणीनंतर सुरू करण्यात आल्या. मात्र, त्यामध्ये फुकट्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येत होती. यामुळे जून महिन्यापासून मध्य रेल्वे प्रशासनाकडून विशेष तिकीट तपासणी मोहीम २० नोव्हेंबरपर्यत राबवण्यात आली. या मोहिमेत ४३ हजार ५२६ फुकटे प्रवासी आढळले. या फुकट्या प्रवाशांकडून दीड कोटी रुपयांचा एकूण दंड वसूलण्यात आला. त्यापौकी मध्य रेल्वेच्या लोकल प्रवासादरम्यान ३९ हजार ५१६ जण विनातिकीट प्रवास करताना आढळल्याने त्यांच्याकडून १ कोटी १० लाख रुपये दंड तिकीट तपासणी मोहिमेवेळी वसूल करण्यात आला. लांब पल्ल्याच्या मेल -एक्सप्रेस ट्रेनमध्येही ४ हजार विनातिकीट प्रवासी आढळले. यांच्याकडूनही ४० लाख रुपये दंड वसूल करण्यात आला.
अधिकृत तिकीट काढून सन्मानाने प्रवास करा ..
तीन टप्प्यांत रेल्वे प्रशासनाने राबविलेल्या मोहीमेत ४३ हजार ५१६ प्रवाशापैकी नियमित टिकट तपासणीवेळी ३६ हजार ७५४ प्रवाशी तर ४ हजार ६१६ इतर प्रकरणी आणि विशेष तिकीट तपासणीवेळी २ हजार १४६ अश्या एकूण फुकट्या प्रवाशांना पकडण्यात आले. रेल्वेत प्रवास करताना अधिकृत तिकीट घेऊन प्रवास करावा. जेणे करून कोरोनाच्या काळात रेल्वे प्रशासनाला सहकार्य होईल, असे अहव्हाण रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मध्य रेल्वेची कारवाई : कोरोनाच्या काळात फुकट्या प्रवाशांकडून दीड कोटींचा दंड वसूल.. - फुकट्या प्रवाशांकडून दंड वसूल
मध्य रेल्वे प्रशासनाने लॉकडाऊन काळात तब्बल ४३ हजार ५१६ प्रवाशांना फुकट्या प्रवाशांना पकडले. या प्रवाशांंकडून एकूण दीड कोटींचा दंड वसूल करण्यात आला .