ETV Bharat / city

ST Employees Strike : ठाण्यातील खोपट डेपोत एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन - खोपट डेपो रक्तदान शिबीर बातमी

ठाण्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी ठाण्यातील खोपट एसटी डेपोमध्ये एका रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी गेले अनेक दिवस काम बंद आंदोलन करत आहेत.

ST Employees Strike
ST Employees Strike
author img

By

Published : Nov 16, 2021, 8:16 PM IST

ठाणे - 'आम्ही जीव घेत नाही तर जीव वाचवतो' असे म्हणत ठाण्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी ठाण्यातील खोपट एसटी डेपोमध्ये एका रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी गेले अनेक दिवस काम बंद आंदोलन करत आहेत. मात्र, या अनोख्या पद्धतीने रक्तदान करून एसटी कर्मचाऱ्यांनी एक सामाजिक पायंडा घातला आहे.

प्रतिक्रिया

श्रद्धांजली वाहण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन -

राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपासह अनेक राजकीय पक्ष व इतर संघटनांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शविला असून मागण्या मान्य झाल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत हा लढा थांबवला जाणार नाही, अशी भूमिका या आंदोलनकर्त्यांनी घेतली असतानाच राज्य सरकार मात्र हा संप मोडून काढण्याच्या तयारीत दिसत आहे. त्यासाठी राज्य सरकारने निलंबनाच्या हत्यार उपसले असून अनेक कर्मचारी निलंबित झाले आहेत तर एकूण 40 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. या एसटी कामगारांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज सकाळपासून ठाण्यातील खोपट एसटी डेपोमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला सर्वसामान्य नागरिकांनी पाठिंबा द्यावा व त्यासाठी या रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे, अशी विनंती करण्यात आली आहे.

संपामुळे दररोज १३ कोटीचा महसुलावर पाणी -

कोरोनामुळे एसटी महामंडळाचे अगोदरच कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला आहे. संपामुळे प्रत्येक दिवशी तब्बल १३ कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. तसेच एसटी महामंडळाचा संचित तोटाही साडेबारा हजार कोटीचा घरात गेला आहे. ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी संपावर गेल्याने सरासरी १०० कोटी रुपयांचा फटका एसटी महामंडळाला बसला. एसटी महामंडळाला संपामुळे दररोज सरासरी १३ कोटी रुपयांचा महसुलावर पाणी सोडावे लागले आहे. उत्पन्नापेक्षा खर्च जास्तएसटी महामंडळाला दर वर्षी प्रवासी उत्पन्न व इतर उत्पन्नाचे स्त्रोत धरून फक्त 7 हजार 800 कोटी इतके उत्पन्न मिळते. तर एसटी महमंडळाच्या 1 लाख कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या वेतनावर वर्षाला 3 हजार 500 कोटी रुपये खर्च होतो. तर साधारणतः इंधनावर 3 हजार कोटी आणि स्पेअर पार्ट आणि टायरला साधारण 600 कोटी इतका खर्च येतो. गेल्या काही वर्षांपासून एसटीच्या प्रवासी संख्येत घट होत असल्याने एसटीचा संचित तोटा वाढत आहे. एसटी महामंडळाचा संचित तोटा हा 2014 -15 आर्थिक वर्षात 1 हजार 685 कोटी रुपये होता. 2018-19 आर्थिक वर्षांत 4 हजार 549 कोटींवर पोहोचला होता. 2020-21 या आर्थिक वर्षांत कोरोनामुळे हा तोटा १२ हजार कोटींच्या घरात जाऊन पोहोचला आहे.

हेही वाचा - Mumbai Weather Update : मुंंबईची हवा दिल्लीपेक्षाही विषारी! वायू प्रदुषणाचा नवा उच्चांक!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.