ETV Bharat / city

ठाण्यात कोरोना लसींचा तुठवडा.. सर्व लसीकरण केंद्र बंद

author img

By

Published : Apr 21, 2021, 8:00 PM IST

ठाण्यात पालिका प्रशासनाने लसीकरण करण्यासाठी ५६ लसीकरण केंद्र सुरु केली होती. मात्र, आता साठा नसल्यामुळे हे लसीकरण  केंद्र बंद आहे. त्यामुळे केंद्राने जास्तीत जास्त लस द्यावी अशी विनंती आणि मागणी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी केली आहे .

लसीकरण करतांना
लसीकरण करतांना

ठाणे - 1 मे पासून १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. परंतु लसीच्या तुटवड्यामुळे सध्या परवानगी असलेल्या नागरिकांच्या लसीकरणातही विघ्न निर्माण होत आहे. ठाणे महापालिकेकडे असलेल्या लसीचा साठा संपत आल्याने, आज अनेक लसीकरण केंद्र बंद होती. तसेच, पुढील साठा मिळेपर्यंत शहरांतील लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

ठाण्यात सर्व लसीकरण केंद्र बंद

मोहीम यशस्वी, पण पुरवठा कमी

१४ जानेवारीपासून लसीकरण मोहिम सुरू झाल्यापासून २ लाख ४४ हजार ४६६ डोस देण्यात आले आहेत. त्यात २,०९,८१७ जणांना पहिला आणि ३४,५९५ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. कोविशिल्डचा पहिला डोस १ लाख ७२ हजार ८८३ जणांना देण्यात आला असून, त्यापैकी ३९,९८८ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तर कोव्हॅक्सिन घेणाऱ्यांचे प्रमाण अनुक्रमे ३२,०२८ आणि २,५६७ इतके आहे. पहिल्या टप्प्यात फ्रंट लाईन वर्कर, त्यानंतर ६० वर्षांवरील नागरिक, ४५ ते ६० वर्षे वयोगटातील सहव्याधी असलेल्या व्यक्ती आणि त्यानंतर ४५ वर्षांवरील सर्वांना लस देण्याची घोषणा सरकारने केली होती. १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लस दिली जाईल, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - कोविडची लढाई लढण्यासाठी वापरले जाणार तेजसचे तंत्रज्ञान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.