ETV Bharat / city

मतदानाच्या दिवशी केंद्रावर दांडी मारणाऱ्या ९१ अधिकाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा - election officers news

मुरबाड तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतीच्या मतदान प्रक्रियेत नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर दांडी मारणाऱ्या ९१ निवडणूक केंद्रांवरील मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, कर्मचारी यांच्यावर तालुका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारल्याची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

thane
thane
author img

By

Published : Jan 16, 2021, 4:36 PM IST

Updated : Jan 16, 2021, 8:08 PM IST

ठाणे - जिल्ह्यात १४३ ग्रामपंचायत निवडणुकीची मतदान प्रक्रिया कालच पार पडली. मात्र मुरबाड तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतीच्या मतदान प्रक्रियेत नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर दांडी मारणाऱ्या ९१ निवडणूक केंद्रांवरील मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, कर्मचारी यांच्यावर तालुका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारल्याची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या सर्वांना विविध मतदान केंद्रावर नियुक्त करण्यासाठी निवडणूक प्रशासनाने लेखी आदेश पारित केले होते.

thane
thane

तीन दिवस प्रशिक्षणास हजर, मात्र मतदानाच्या दिवशी दांडी

मुरबाड तालुक्यातील शिक्षक व शिक्षिका यांना ग्रामपंचायात निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून प्रशिक्षणासाठी १ जानेवारी आणि ४ तसेच ८ जानेवारी असे तीन दिवस मुरबाड शहरातील नमस्कार हॉलमध्ये मतदानाविषयी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी म्हणुन शिक्षक व शिक्षिकांना १५ जानेवारीला ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडणार असल्याने १४ जानेवारी रोजी कारवाई झालेल्या सर्वांना आदेश पारीत केले होते.

दांडी बहाद्दरांवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात तक्रार

मुरबाड तहसीलदार कार्यालयात उपस्थित राहुन मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी म्हणुन निवडणूक केंद्रांवर जाण्यासाठी टाळाटाळ न करता हजर राहून निवडणूक प्रक्रिया पार पाडने कायदेशीर बंधनकारक असताना मुरबाड तालुक्यातील एकूण ९१ शिक्षकांनी शासकीय आदेश धुडकावून निवडणूकीत मतदान केंद्रावर दांडी मारल्याने मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८चे कलम २३ अन्वये मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी म्हणून नेमणुका केलेल्या शिक्षक व शिक्षिका यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश मुरबाड तहसीलदार अमोल कदम यांनी काढले आहेत. तर मुरबाड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी दांडी बहाद्दर ९१ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दिली आहे.

शाळेच्या फळ्यावर, निवडणूक कामी तीन दिवस शाळा बंद

कारवाई करण्यात आलेल्या शिक्षक, शिक्षिका मतदान प्रक्रियेत तर सहभागी झाले नव्हते. शिवाय शाळेलाही दांडी मारली होती. विशेष म्हणजे शाळेच्या फळ्यावर या शिक्षकांनी लिहून ठेवले होते, की निवडणूक कामी तीन दिवस शाळा बंद राहणार. त्यामुळे लोकशाहीचा उत्सव समजल्या जाणाऱ्या सणाला तर दांडी मारल्याने एकंदरीत ना शाळेवर ना निवडणुकीत. त्यामुळे तालुक्यातील शिक्षणाचा दर्जा कसा असेल, याची कल्पनादेखील करण्यासारखी नसल्याची गावकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.

Last Updated : Jan 16, 2021, 8:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.