अकोला - गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई व ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यावर अनेक आरोप होत होते. त्यामुळे शेवटी अकोला शहरातील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यांमध्ये माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यासह 27 पोलीस अधिकाऱ्यांविरोधात बुधवारी रात्री उशिरा ॲट्रॉसिटी ॲक्ट व विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचे घटनास्थळ ठाणे असल्यामुळे या प्रकरणाचा तपास ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, या प्रकारामुळे आता पोलीस प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे.
इतरही पोलीस अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल
ठाणे पोलीस आयुक्तपदी असताना परमवीर सिंग यांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराज घाडगे यांनी पोलीस महासंचालक तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली आहे. या सोबतच माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यासह पोलीस उपायुक्त पराग मणेरे, संजय शिंदे, सुनील भारद्वाज, विजय फुलकर आदी पोलीस अधिकाऱ्यांविरोधात त्यांनी तक्रार दाखल केली आहे. अकोला सिटी कोतवाली पोलिसांनी यामध्ये झिरो अंतर्गत तक्रार दाखल करुन घेण्यात आली असून हे प्रकरण ठाणे पोलिसांकडे वर्ग केले आहे.
हेही वाचा - आयपीएस परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ , अकोला शहर पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल