ठाणे - नवीन वर्षाच्या स्वागतासाठी वाढत्या कोरोनामुळे अनेक निर्बंध सर्वठिकाणी लावण्यात आलेत. परंतु मुंबईमध्ये मात्र हे निर्बंध कडक करण्यात आले आहेत. त्यामुळे पार्टी करणाऱ्या कंपनीने आपला मोर्चा ठाण्यातील ग्रामीण भागाकडे वळवला आहे. जर तुम्हीही असेच काही ठरवले असेल तर जरा थांबा. कारण ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या जवळपास 50 स्पेशल टीम या गर्दी करू पाहणाऱ्या पार्ट्यांवर (New Year 31st Eve Party ) नजर ठेवणार आहेत आणि कारवाई ही करणार आहेत.
पोलिसांसहित जवळपास 50 स्पेशल टीम गर्दी करणाऱ्या पार्ट्यांवर नजर ठेवणार आहेत. संपूर्ण ठाणे जिल्ह्यात या टीम फिरणार असून ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन या 50 टीम तयार केल्या आहेत. खासकरून ठाण्यातील ग्रामीण भागात गर्दी करणाऱ्या पार्ट्या होऊ शकतात. त्यामुळे अशा भागांकडे म्हणजेच पिकनिक पॉईंट व धाब्यांवर या टीम फिरकणार आहेत. नवीन वर्षात कारवाईला सामोरे जायचे नसेल, तर मग नक्कीच कोरोनाचे सर्व नियम पाळा कारण कोरोना रुग्ण हळू हळू वाढत आहे. त्यामुळे आता जास्त काळजी घ्या, असे आव्हान यावेळी ठाणे जिल्हाधिकारी यांनी केलं आहे.
हेही वाचा - Ajit Pawar Reply : राज्य कसं चालवायचं ते आम्हाला कळतं; अजित पवारांचा विरोधकांना टोला