ETV Bharat / city

OLA Driver Murder : डोक्यात दगड घालून ओला चालकाची हत्या, चार आरोपींना अटक - ओला चालक हत्या ठाणे

आरोपींनी ओला चालकाला निर्जन स्थळी नेले आणि डोक्यात दगड घालून त्याची ( OLA Driver Murder thane ) हत्या केली. आरोपी हे नशेडी होते, त्यांना नशा करण्यासाठी पैसे हवे होते. त्यांनी ओला चालकाकडून ( OLA Driver Murder news ) जबरदस्तीने पैसे घेतले. प्रतिकार केला असता आरोपींनी चालकाची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

OLA Driver Murder thane
ओला चालक हत्या ठाणे
author img

By

Published : Jun 1, 2022, 7:04 AM IST

ठाणे - चार जाणांनी ओला चालकाची हत्या केल्याची घटना घडली आहे. आरोपींनी ओला चालकाला निर्जन स्थळी गाडी थांबवायला लावले आणि तेथे डोक्यात दगड घालून त्याची ( OLA Driver Murder thane ) हत्या केली. आरोपी हे नशेडी होते, त्यांना नशा करण्यासाठी पैसे हवे होते. त्यांनी ओला चालकाकडून ( OLA Driver Murder news ) जबरदस्तीने पैसे घेतले. प्रतिकार केला असता आरोपींनी चालकाची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

माहिती देताना पोलीस अधिकारी

हेही वाचा - पैगंबरांचा अवमान करणाऱ्या नुपूर शर्माच्या अटकेसाठी राष्ट्रवादीची मुंब्रा येथे निदर्शने

अटक चारही आरोपी हे नशेडी असून ते गांजा या अमली पदार्थाच्या आहारी गेलेले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपींनी गाडी खर्डीरोड जवळ लघुशंका करण्यासाठी थांबवली. नशा करण्यासाठी आरोपींना पैसे हवे होते म्हणून त्यांनी ओला चालकालाच मारहाण करण्यास सुरुवात केली. ओला चालकाच्या खिशातून आरोपींनी अडीच हजार रुपये आणि एक मोबाईल फोन जबरदस्तीने काढून घेतला. ओला चालकाने प्रतिकार केला असता आरोपींनी त्याच्या डोक्यात दगड आणि पेव्हरब्लॉकने जोरदार प्रहार करून त्याची हत्या केली.

चारही आरोपींना अवघ्या १० तासांत शीळ डायघर पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त व्यंकट आंधळे यांनी दिली. आरोपींना अटक करून न्यायालयात नेले असता त्यांना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. अटक आरोपींमध्ये हसिरूल हालीम शेख (वय ३६ रा. मुंब्रादेवी कॉलोनी, दिवा पूर्व) आतिश भोसले (वय २१ रा. तुळशीपाडा पाईपलाईन, भांडुप) ओंकार कासेकर (वय २१ रा. कळवा रेल्वे लाईन झोपडपट्टी कळवा) आणि प्रशांत पेरिय (वय १९ रा. दातिवली गाव, दिवा ठाणे) यांचा समावेश आहे. तर यांच्यासह एक अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेण्यात आलेले आहे.

ठाण्यातील शिळ डायघर पोलिसांना २९ मे रोजी दिवा गावातील एका शेतकऱ्याने एका अज्ञात व्यक्तीचा खून झाला असून त्याचे शव खर्डी रोडकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावरील ब्रिज खाली अर्धनग्न परिस्थितीत पडला असल्याची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच शिळ डायघर पोलीस घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी पंचनामा केला असता मृत व्यक्तीच्या डोक्यात दगड आणि पेव्हरब्लॉक मारून त्याची हत्या केली असल्याचे निष्पन्न झाले.

शीळ डायघर पोलिसांना मृतदेहाजवळ एक ओला कंपनीची गाडी उभी असलेली आढळून आली. तपासादरम्यान पोलिसांनी गाडीच्या नंबरवरून ओला कंपनी मार्फत मृताची ओळख पटली. ओला चालकाचे नाव मोहम्मद अली अन्सारी असून तो घाटकोपर मुंबई येथील असल्याचे निष्पन्न झाले. डायघर पोलिसांच्या तपासाची सूत्रे हलली. आरोपींनी ओला बुक केल्याने त्यांचे लोकेशन आणि बुक केलेला मोबाईल नंबर याच्या त्रांत्रिक तपासावरून आरोपी जाळ्यात अडकले.

हेही वाचा - Husband Tore wifes Ear : चपाती बनवण्यावरुन सासू सुनेत वाद नवऱ्याने बायकोचा कान फाडला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.