ETV Bharat / city

ST Workers Son Committed Suicide : संपामुळे आर्थिक अडचण; एसटी कर्मचाऱ्याच्या मुलाने केली आत्महत्या - ST employees son suicide in Solapur

एसटी संपामुळे आर्थिक अडचणीत ( ST Employees in trouble due to strike ) सापडलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्य आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलत आहेत. अशीच घटना सोलापूरमध्ये घडली आहे. एसटी कर्मचाऱ्याच्या मुलाने गळफास लावून आत्महत्या केली ( ST employees son suicide in Solapur ) आहे.

अमर माळी
अमर माळी
author img

By

Published : Jan 20, 2022, 4:16 PM IST

Updated : Jan 20, 2022, 10:36 PM IST

सोलापूर - एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपात ( ST Workers Strike ) सहभागी व्हायचे आहे, असे सांगून वडिलांनी घर सोडले. त्यानंतर राहत्या घरी मुलाने आईची साडी गळ्याला गुंडाळून आपली जीवनयात्रा ( ST employees son suicide in Solapur ) संपविली. ही दुर्दैवी घटना शहरात घडली आहे. अमर तुकाराम माळी ( वय २० वर्षे, रा. कोंडी), असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. हा दुर्दैवी प्रकार बुधवारी (दि. १९ जानेवारी) दुपारच्या सुमारास घडला.

अमर माळी या तरुणाने दयानंद महाविद्यालयात १२ वीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. गेल्या काही दिवसापासून अमर घरात शांत बसत होता. बुधवारी सकाळी त्याने वडील तुकाराम माळी यांना पैशाची मागणी केली होती. वडिलांनी माझे काम दोन-तीन महिने झाले बंद आहे. मला पगार नाही, तुला पैसे कुठून देऊ असे मुलाला उत्तर दिले होते.

एसटी कर्मचाऱ्याच्या मुलाने केली आत्महत्या

हेही वाचा-ST Employee in Kolhapur : कारवाईच्या भीतीने एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या; भुदरगड तालुक्यातील दुसरी घटना

वडील एसटी संपात गेले आणि मुलाने गळफास घेतला-

अमरचे वडील एसटीचे आंदोलन सुरू असलेल्या ( ST Employees strike in Solapur ) ठिकाणी गेले. अमर हादेखील घराबाहेर गेला. त्यानंतर तो दुपारी घरी आला. घरात आई व त्याची चुलती जेवण करत होती. आईने त्याला जेवण्यासाठी आग्रह केला. मात्र तो नको म्हणत थोडा आराम करतो म्हणून स्वतःच्या खोलीत गेला. बराच वेळ झाले तरी तो बाहेर आला नाही. त्यामुळे आईने त्याला आवाज दिला. मात्र आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्या खोलीजवळ गेल्या. आवाज देऊ लागल्या, मात्र काहीच आवाज येत नव्हता, आतून कडी लावण्यात आली होती. मोठ्या भावानेही आवाज दिला. शेवटी खिडकीतून पाहिले असता अमर साडीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला.

अमर माळी
अमर माळी

हेही वाचा-ST Workers Strike : बडतर्फ एसटी कर्मचाऱ्यांची संख्या ४४७२ तर आज २५० कर्मचाऱ्यांवर कारवाई!

आईने हंबरडा फोडला-

भावाने दरवाजा तोडून आत प्रवेश करून अमरला खाली उतरवले. अमरला पाहताच आईने हंबरडा फोडला. त्याला उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारांपूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.आर्थिक अडचणीत सापडलेल्या एसटी कर्मचाऱ्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हेही वाचा-ST Workers Strike : संपकरी एसटी कामगारांना मोठा झटका, आता 'या' कर्मचाऱ्यांच्या हाती लालपरीची धुरा!

सत्तर दिवस उलटूनही एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप

शासनामध्ये विलिनीकरण करावे या प्रमुख मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचारी हे प्रत्येक डेपोसमोर बसून उपोषण करत आहेत. मात्र, यावर सरकार मात्र काही तोडगा काढत नसल्याने संप दिवसेंदिवस वाढत आहे. तर, दुसऱ्या बाजूला एसटी कर्मचारी संपावर असल्यामुळे त्यांचे पगारदेखील न झाल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येत आहे.

Last Updated : Jan 20, 2022, 10:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.