ETV Bharat / city

Solapur Accident : सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्याचा गाडीचा अपघात; एक ठार, दोघं जखमी - सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्याचा गाडीचा अपघात

पुणे-सोलापूर महामार्गावर भादलवाडी गावाच्या हद्दीत बिल्ट कंपनीच्या समोर कंटेनर आणि गाडीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून जागीच ठार झाला आहे. तर, दोघेजण या अपघातात गंभीर जखमी झाले ( accident in pune solapur highway one killed two injured ) आहेत.

accident in pune solapur highway
accident in pune solapur highway
author img

By

Published : Jul 20, 2022, 8:41 PM IST

सोलापूर - कंटेनर व स्विफ्ट गाडीची जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून जागीच ठार झाला आहे. तर, या अपघातात दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भादलवाडी गावाच्या हद्दीत बिल्ट कंपनीच्या गेटसमोर झाला. उमेश श्रीकृष्ण वैद्य ( वय ४७, . अदित्यनगर विजापुर रोड सोलापुर ) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तर, राजकुमार श्रीपती वाघमारे ( वय, ६२ ) व स्विफ्ट चालक प्रफुल्ल रमेश शिरसागर हे गंभीर जखमी झाले ( accident in pune solapur highway one killed two injured ) आहेत.

असा झाला अपघात - भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याकडून सोलापूरकडे कंटेनर ( एम.एच. ०४ जे के ४४०५ ) हा भरधाव वेगाने निघाला होता. भादलवाडी येथे आल्यानंतर तो कंटेनर दुभाजकामधून बिल्ट कंपनीकडे जात असताना सोलापूर हून पुण्याच्या दिशेने निघालेल्या स्विफ्ट कार ( एम. एच. १३ बी क्यू ००९७ ) ची त्यास जोरदार धडक बसली. यामध्ये डोक्यास जबर मार लागल्याने स्विफ्ट कारमधील उमेश वैद्य यांचा जागीच मृत्यू झाला. तर, इतर दोघेजण गंभीररित्या जखमी झाले. मृत वैद्य हे सोलापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयात अव्वल कारकून म्हणून कार्यरत होते. अपघातग्रस्त कंटेनर चालक फरार झाला असून, त्याच्याविरोधात भिगवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महामार्ग झाल्याने अपघात वाढले - पुणे-सोलापूर महामार्गाचे चौपदरीकरणामुळे वाहनांना खूप वेग प्राप्त झाला आहे. त्यामुळे अशा अपघातांची भर पडत आहे. अपघाताचे वृत्त समजताच भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी घटनास्थळी भेट देत जखमींना रुग्णालयात दाखल केले. पुढील तपास सहायक फौजदार केशव वारघड करीत आहे.

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात स्मशानशांतता - प्रांत अधिकारी कार्यालयाच्या सरकारी कामासाठी अव्वल कारकून उमेश वैद्य व इतर कर्मचारी, मुंबई येथील उच्च न्यायालयाकडे जात होते. पण, पुणे-सोलापूर महामार्गावर मृत्यू त्यांची वाट पाहत होता. भिगवणजवळ कंटेनरची जोरदार धडक बसली. या घटनेची माहिती सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त होताच सर्व अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले. बुधवारी दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयात स्मशान शांतता होती.

हेही वाचा - Deepak Kesarkar : 'मातोश्री, शिवसेना भवनावर दावा केला नाही, परंतु...'; दीपक केसरकरांनी स्पष्टचं सांगितलं

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.