सोलापूर - औरंगाबाद, उस्मानाबाद शहराच्या नावावरून ( Renaming of Aurangabad ) राज्यात रान उठले आहे. उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव तर, औरंगाबादचे नाव संभाजी नगर करण्याचा निर्णय झाला आहे. तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने या दोन शहरांची नावे बदलण्याचा निर्णय घेतला होता. एकनाथ शिंदे सरकारने ( Eknath Shinde Govt ) देखील याला मान्यता दिली आहे. यावरून औरंगाबाद उस्मानाबाद मधून विरोध केला जात आहे. तर, काही जण समर्थन करत आहेत. समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अबू आजमी ( MLA Abu Azmi ) हे सोलापूरहुन उस्मानाबाद शहराच्या दौऱ्यावर असातांना अबू आझमी यांनी उद्धव ठाकरेंवर ( MLA Abu Azmi criticized Uddhav Thackeray ) निशाणा साधला. उद्धवजी तुम्ही एक नवं शहर निर्माण करा, त्याला बाळासाहेब ठाकरेंच नाव द्या, तुमच्या आईच नाव द्या असे अबू आजमी पत्रकार परिषदेत म्हणाले.
मीर उस्मान अलीने भारताला केली मदत - उस्मानाबाद शहराचे नाव निजाम संस्थेतील एका नावाबने भारताला मोठी मदत केली होती.सहा टन सोनं देऊन भारताला मोठी आर्थिक मदत केली होती.आणि यावरून उस्मानाबाद शहराला नाव देण्यात आलं होतं.धाराशिव हे नाव तर एका गुहेच नाव आहे. उस्मानाबाद शहरातुन अनेकजण धाराशिव नावाला विरोध करत आहेत .त्यांना पाठिंबा देण्यासाठी अबू आझमी मुंबईहुन सोलापूरला आले आणि येथील कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली.
हेही वाचा - Aaditya Thackeray : औरंगाबादेत आदित्य ठाकरेंची तोफ बंडखोरांवर धडालली; 'सगळे नीट चालले असताना गद्दारी का'
औरंगाबाद नाव हे औरंगजेब या मुघल राजवरून पडले - मुघल सामराज्यामधील राजा औरंगजेब यांच्या नावावरून औरंगाबाद हे नाव पडले. याबाबत खुलासा करताना अबू आझमी म्हणाले की, या राजाने अनेक सामाजिक कार्य केले होते. अनेक हिंदू मंदिरांच्या जीर्णोद्धारसाठी निधी दिला होता. याबाबत वाराणसी हिंदू विद्यापीठात देखील नोंद आहे. शिवाजी महाराज, संभाजी महाराज, औरंगजेब यांचामधील 7 युद्ध हे राजकीय होते .यामध्ये हिंदू मुस्लिम असे काही नव्हते, पण हे राजकीय लोक हिंदू मुस्लिम समाजामध्ये दुरावा निर्माण करण्यासाठी आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेत आहेत.
नवीन शहर निर्माण करा आणि द्या नावे- उद्धव ठाकरे सरकार कोसळताना त्यांनी उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव, औरंगाबादचे नाव संभाजी नगर केले होते. यावर अबू आजमी यांनी उद्धव ठाकरे यांना सल्ला दिला, महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी जमिनी रिकाम्या आहेत. त्या ठिकाणी नवीन शहर वसवून त्या शहराला बाळासाहेबांचे नाव द्या, तुमच्या आईचे नाव द्या,पण हिंदू मुस्लिम राजकारण करू नका महाराष्ट्र राज्यात किंवा देशात अराजकता निर्माण करू नका असे समाजवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष अबू आझमी म्हणाले.
हेही वाचा - Actress Arpita Mukherjee : अभिनेत्री अर्पिता मुखर्जी पार्थ चॅटर्जी यांच्या जवळच्या का मानल्या जातात!