ETV Bharat / city

हृदयद्रावक.. शेततळ्यात बुडून आई व दोन चिमुकलींचा मृत्यू, उत्तर सोलापूर तालुक्यातील घटना

शेततळ्यात बुडून आई व दोन मुलींचा मृत्यू ( Mother and Two Daughter Drowned ) झाला आहे. सारिका आकाश ढेकळे (वय 20 वर्ष, रा. ढेकळे वस्ती, पाथरी ,उत्तर सोलापूर), गौरी आकाश ढेकळे (वय 4 वर्ष, रा. ढेकळे वस्ती, उत्तर सोलापूर) आणि आरोही आकाश ढेकळे (वय 1.5 वर्ष) अशी मृतांची नावे ( Three Drowned in Farm Pond ) आहेत.

Mother and Two Daughter Drown
शेततळ्यात बुडून आई व दोन मुलींचा मृत्यू
author img

By

Published : Jan 21, 2022, 7:47 PM IST

Updated : Jan 21, 2022, 10:51 PM IST

सोलापूर - शेततळ्यात बुडून आईसह दोन चिमुकलींचा मृत्यू ( Mother and Two Daughter Drowned )झाल्याने सोलापुरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी चारच्या दरम्यान घडली. उत्तर सोलापूर तालुक्यातील पाथरी या गावात असलेल्या ढेकळे वस्ती येथे ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन साठी शासकीय रुग्णालयात दाखल केले.

शेततळ्यात बुडून आई व दोन चिमुकलींचा मृत्यू,

आई व दोन चिमुकल्यांचा मृत्यू -

सारिका आकाश ढेकळे (वय 20 वर्ष, रा. ढेकळे वस्ती, पाथरी ,उत्तर सोलापूर), गौरी आकाश ढेकळे (वय 4 वर्ष, रा. ढेकळे वस्ती, उत्तर सोलापूर) आणि आरोही आकाश ढेकळे (वय 1.5 वर्ष) अशी मृतांची नावे ( Three Drowned in Farm Pond ) आहेत. तिन्ही मृतदेह शवविच्छेदनसाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Mother and Two Daughter Drowned
शेततळ्यात बुडून आई व दोन चिमुकलींचा मृत्यू

शेततळ्यात बुडून आईसह दोन चिमुकलींचा मृत्यू झाल्याने सोलापुरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी चारच्या दरम्यान घडली. उत्तर सोलापूर तालुक्यातील पाथरी या गावात असलेल्या ढेकळे वस्ती येथे ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन साठी शासकीय रुग्णालयात दाखल केले.सारिका आकाश ढेकळे(वय 20 वर्ष),गौरी आकाश ढेकळे(वय 4 वर्ष),आरोही आकाश ढेकळे(वय दीड वर्ष) अशी मृतांची नावे आहेत.

आत्महत्या केल्याची ग्रामस्थांत चर्चा -
शुक्रवारी दुपारी पती आकाश ढेकळे हे आपल्या शेतात काम करत होते. द्राक्षांची बागायत यांच्या शेतात लावण्यात आली आहे. सारिका आपल्या दोन मुलींसह शेतात होती. पण अचानकपणे आईसह दोन्ही मुले गायब झाली. बाजूच्या शेतातील शेतमालक हे पाण्याची मोटर सुरू करण्यासाठी आले असता, त्यांना शेततळ्यात दीड वर्षीय आरोही ही पाण्यावर तरंगताना दिसून आली. अशोक गुंड यांनी आरडाओरडा करून आजूबाजूला असलेल्या शेतकऱ्यांना बोलावून घेतले. आणि आरोही हिला बाहेर काढले. पण आरोहीला बाहेर काढताना गौरी आणि सारिका यांचे मृतदेह दिसले. याबाबत काही ग्रामस्थांनी ताबडतोब पोलिसांना फोन वरून माहिती दिली. आईने आपल्या दोन चिमुकलींसह आत्महत्या केल्याची चर्चा सुरू होती. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. हे आत्महत्या आहे का, अपघात याचा उलगडला लवकरच होईल अशी माहिती पोलिसांनी दिली.

शेततळ्यात मृत्यू होण्याची एकाच महिन्यातील दुसरी घटना -

उत्तर सोलापूर तालुक्यात शेततळ्यात बुडून मृत्यू होण्याची ही एकाच महिन्यातील दुसरी घटना आहे. यापूर्वी उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी या गावात तीन अल्पवयीन मुलींचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला होता. आज 21 जानेवारी शुक्रवारी सायंकाळी आईसह दोन चिमुकलींचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला आहे.

Last Updated : Jan 21, 2022, 10:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.