ETV Bharat / city

Solapur NTPC FGD Plant Fire : सोलापुरातील एनटीपीसीच्या एफजीडी प्लांटमध्ये भीषण स्फोट - एनटीपीसीच्या एफजीडी प्लांटमध्ये भीषण स्फोट

सोलापूर येथे एफजीडी प्लांटमध्ये आज ( 20 जुलै ) सायंकाळच्या सुमारास मोठा स्फोट ( Solapur NTPC FGD Plant Fire ) झाला. ट्रायल घेताना तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा स्फोट झाला आहे.

Solapur NTPC FGD Plant Fire
Solapur NTPC FGD Plant Fire
author img

By

Published : Jul 20, 2022, 9:14 PM IST

सोलापूर - न्यूक्लिअर थर्मल पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NTPC) सोलापूर येथे एफजीडी प्लांटमध्ये आज ( 20 जुलै ) सायंकाळच्या सुमारास मोठा स्फोट ( Solapur NTPC FGD Plant Fire ) झाला. फ्युअल गॅस डिझास्टर हा प्रोजेक्ट नवीन आहे. ट्रायल घेताना तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा स्फोट झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही, अशी माहिती एचआर विभागातील अधिकारी सुभाष वाघमारे यांनी दिली आहे.

नव्या प्रोजेक्टचे ट्रायल घेताना स्फोट - एनटीपीसी सोलापूर शहराजवळील फताटेवाडी येथे आहे. जवळपास 2200 एकर मध्ये असलेला हा प्रकल्प 2017 साली कार्यान्वित झाला होता. येथे 1320 मेगावॅट वीजनिर्मिती होते. केंद्र शासनाच्या या प्रोजेक्टमूळे आजूबाजूच्या परिसरात पर्यावरणावर दुष्परिणाम होऊ नये म्हणून नवीन फ्युअल गॅस डिझास्टर (FGD) तयार केला जात आहे. आज बुधवारी दुपारी एफजीडीच्या चिमणीच ट्रायल घेताना मोठा स्फोट होऊन आग लागली. ही आग पाहून आजूबाजूला असलेल्या ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले होते.

एनटीपीसीच्या एफजीडी प्लांटमध्ये झालेला भीषण स्फोट

तांत्रिक बिघाडामुळे आग - एफजीडी म्हणजेच फ्युअल गॅस डिझास्टरचे ट्रायल घेताना हा अपघात झाला. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज एनटीपीसीमधील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. याची सविस्तर माहिती घेऊन लवकरच अपघात कशामुळे झाला याचा खुलासा करणार आहेत.

हेही वाचा - Video : वेगाने आलेली रुग्णवाहिका स्लिप होऊन टोलनाक्यावर उलटली.. चौघांचा मृत्यू.. पहा सीसीटीव्ही फुटेज..

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.