ETV Bharat / city

मोहोळ तालुक्यात वाळू तस्करांवर मोठी कारवाई, 98 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त - Mohol taluka property worth Rs 98 lakh seized

सीना नदीतून बेकादेशीर वाळू उपसा करून एकुरके गावच्या शिवारातील स्मशानभूमीजवळ वाळूमाफियांनी वाळू साठा केल्याची गोपनीय माहिती मोहोळ पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी आठ जणांना गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वाळू तस्करांवर मोठी कारवाई,
वाळू तस्करांवर मोठी कारवाई,
author img

By

Published : May 25, 2021, 1:50 PM IST

पंढरपूर- मोहोळ तालुक्यातील एकुरके येथे वाळू तस्करी करणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली, या कारवाईत एक जेसीबी ट्राॅली, सहा ट्रॅक्टर व 12 ब्रास वाळू असा एकूण 98 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. याप्रकरणी गावच्या पोलिस पाटीलांसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.

वाळू तस्करीत आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल
सीना नदीतून बेकादेशीर वाळू उपसा करून एकुरके गावच्या शिवारातील स्मशानभूमीजवळ वाळूमाफियांनी वाळू साठा केल्याची गोपनीय माहिती मोहोळ पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी आठ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यामध्ये विलास भीमराव ढेरे, उमेश भारत ढेरे ( दोघे रा.बोपले),अमोल भास्कर ढवण,नानासाहेब चांगदेव साठे,सोमनाथ नागनाथ कोल्हाळ,नीलेश उत्तम कोल्हाळ व पोलीस पाटील तानाजी भानुदास साठे (सर्व रा. एकुरके) यांच्यावर गुन्हा दाखल करणाऱ्यांची नावे आहेत.

गावातील पोलीस पाटीलांच्या मदतीने वाळूची तस्करी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांना गुप्त माहिती मिळावी. त्यानंतर पोलीस पथक तयार करून पाठवून दिले. सदर पथकाने मोहोळ तालुक्यातील एकुरके या गावामध्ये सीना नदीतून जेसीबीच्या सहाय्याने ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये वाळू भरून वाहतूक करण्याच्या तयारीत असणार्‍या वाळूतस्करांनी वाहने जागेवरच सोडून घटनास्थळावरून पळ काढला. यावेळी पोलिसांनी एक जेसीबी, ट्रॉलीसह, सहा ट्रॅक्टर व 12 ब्रास वाळू असा मुद्देमाल ताब्यात घेतला. या प्रकरणामध्ये पोलीस पाटील यांच्या देखरेखेखाली ही वाळू चोरी होत असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सत्यवान जाधव यांनी मोहोळ पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून वरील आठ जणांच्या विरोधात वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास हेडकॉन्स्टेबल पोफळे करीत आहेत.

हेही वाचा- बार्ज 'पी305' दुर्घटना : ७१ मृतदेह सापडले; शोधकार्य अजूनही सुरुच

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.