पुणे - भाजपा नेते किरीट सोमैया यांना एक तासापूर्वी संचेती ( Kirit Somaiya In Pune ) रुग्णालयात आणण्यात आलं आहे. त्यांच्या मनगटीला जबरदस्त बुक्का ( kirit somaiya injured ) मार लागला असून त्यांच्या माकड हाडाला देखील मार लागला आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून हातावर प्लास्टर लावण्यात आला आहे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा त्यांचा बीपी खूप वाढला होता आत्ता बीपी स्टेबल असून एक दिवस त्यांना निरक्षणात ठेवण्यात येणार आहे. उद्या त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल, अशी माहिती संचेती हॉस्पिटलचे संचालक पराग संचेती यांनी दिली आहे.
शिवसैनिक आक्रमक -
पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमधे भ्रष्टाचार झाल्याचा आरोप किरीट सोमैया यांनी केली होता. या भ्रष्टाचाराची तक्रार देण्याकरिता किरीट सोमय्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पोहोचले होते. यावरून शिवसैनिक आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. महापालिका परिसरात शिवसैनिकांनी सोमैयांवर हल्ला केला. दरम्यान, यावेळी झालेल्या झटापटीदरम्यान सोमैयांच्या पायाला दुखापत झाली असून त्यांना संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा - Lata Mangeshkar health : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर, आयसीयूत उपचार सुरू