सोलापूर - चोरलेल्या ऑटो रिक्षाची जबाबदारी मी स्वीकारणार नाही, असे म्हणताच दोघांनी मित्राची हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर मृतदेह कोरड्या विहिरीत टाकून पसार झाले होते. दोन्ही मित्रांनी विरोध करणाऱ्या मित्राला एवढ मारले की, त्याची कवटी फोडली. मृतदेह कुजवून कोरड्या विहिरीत फेकले होते. नरेश नागेश चिंता (वय २४, नवीन विडी घरकुल कुंभारी) असे मृत तरुणाचे नाव आहे. मात्र २४ तासांत मृताचा व संशयित आरोपींचा शोध लावून त्यांना जेरबंद करण्यात वळसंग पोलिसांना यश आले आहे. याबाबत पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत अधिकृत माहिती दिली आहे.
कवटी फुटली असल्याचा वैद्यकीय अहवाल : मंगळवारी दुपारी विडी घरकूल परिसरातील कुंभारी हद्दीत एका हॉटेल शेजारील विहिरीत अनोळखी व्यक्ती बेशुद्धावस्थेत आढळून आला होता. वळसंग पोलिसांनी त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर गंभीर दुखापतीमुळे त्याची कवटी फुटली असल्याचा अहवाल दिला. पोलिसांनी केलेल्या तपासानुसार नरेश नागेश चिंता (वय २४, नवीन विडी घरकुल कुंभारी) याचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. नरेश चिंता व त्याचे मित्र राहुल पुरुड, अनिल राडम यांनी तारण ठेवलेली ऑटो रिक्षा चोरी केली होती. ती ठेवायची कुठे असा प्रश्न पडला होता. यावरून तिघांमध्ये वाद सुरू होता.
अशी झाली हत्या : नरेश चिंता व त्याच्या मित्रांनी दारूची पार्टी केली होती. दारूच्या नशेत राहुल परड आणि अनिल राडम यांनी नरेश चिंता याच्या डोक्यात दगड घातला. तोंडावर देखील दगड मारून चेहरा चेंदामेंदा केला होता. त्यांनतर नरेशचा मृतदेह खून करून मंगळवारी दुपारच्या दरम्यान कोरड्या विहिरीत टाकून दिला. कोरड्या विहिरीत मृतदेह टाकून ते फरार झाले होते. कोरड्या विहिरीत मृतदेह असल्याची माहिती मिळताच वळसंग पोलीस घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करुन आणि मृतदेह शवविच्छेदनसाठी सिव्हिल हॉस्पिटलला पाठवून दिले. वळसंग पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. घटनास्थळ आणि आजूबाजूला असलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. या आधारे पोलिसांनी राहुल पुरड आणि अनिल राडम याना तातडीने जेरबंद करून न्यायालयात हजर केले. पोलीस कोठडीत त्यांनी मान्य केले की, नरेश चिंता याचा खून केला. तारण ठेवलेली ऑटो रिक्षा ठेवायची कुठे यावरून वाद होऊन खून केल्याचे कबूल केले.
हातावरील गोंदणामुळे शोध : मृत नरेश चिंता याचा चेहरा ओळखण्यासारखा नव्हता. वळसंग पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी त्याचा फोटो आणि एका हातावरील आई नावाचे गोंदण दुसऱ्या हातावरील जखमा व्हॉट्सअॅपद्वारे ५० ग्रुपवर पाठविल्या. मृताने अलीकडेच हातावर गोदवून घेतल्याचे त्याच्या वडिलांना आठवल आणि त्याची ओळख पटली. त्यानंतर त्याच्या फोन संभाषणातून हा प्रकार मित्रांनीच घडवून आणल्याचे उघडकीस आले.
हेही वाचा - Navi Mumbai Crime : अल्पवयीन मुलीवर दबाव टाकून अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक