ETV Bharat / city

FIR on Rally Organizers : सोलापुरात मुस्लिम समाजाचा विराट मोर्चा; आयोजकांवर गुन्हे दाखल - mim rally in solapur

सोलापूर शहरात एमआयएम पक्ष (MIM Rally in Solapur) व इतर पक्षातील नेत्यांच्या माध्यमातून मुस्लिम नागरिकांना घेऊन विराट मोर्चा (Muslim community rally in Solapur) काढण्यात आला होता. भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीनकुमार जिंदाल यांनी मोहंमद पैगंबर यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यांच्या विरोधात सोलापुरात शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला होता.

mim rally
सोलापुरात मुस्लिम समाजाचा विराट मोर्चा
author img

By

Published : Jun 11, 2022, 4:52 PM IST

Updated : Jun 12, 2022, 7:43 AM IST

सोलापूर - सोलापूर शहरात एमआयएम पक्ष (MIM Rally in Solapur) व इतर पक्षातील नेत्यांच्या माध्यमातून मुस्लिम नागरिकांना घेऊन विराट मोर्चा (Muslim community rally in Solapur) काढण्यात आला होता. भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीनकुमार जिंदाल यांनी मोहंमद पैगंबर यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यांच्या विरोधात सोलापुरात शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला होता. पण या मोर्चात तरुणांची हुल्लडबाजी पाहायला मिळाली. त्यामुळे आज मोर्चा आयोजकांसह मोर्चात सहभागी झालेल्या अनेकांवर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले (FIR on rally Organizers) आहेत. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बेंबडे करत आहेत. याबाबत अधिकृत माहिती सदर बाजार ठाण्यातील पोलीस निरीक्षक पोपटराव धायतोंडे यांनी दिली आहे.

गुन्हा दाखल झालेल्याची नावे - एमआयएमचे सोलापूर शहर आणि जिल्हा प्रमुख फारुख शाब्दी, गाजी जहागीरदार, रियाज हुंडेकरी, रमीज सय्यद, अबू हुरेरा इम्रान सय्यद, सलीम उर्फ पामा सय्यद, हारीस कुरेशी, पालेखान रशीद खान पठाण, रसूल पठाण, कमरूल सलाउद्दीन शेख, यांच्या विरोधात व इतर कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. बेकायदा जमाव जमवून तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या गेटचे नुकसान केले असल्याची तक्रार कॉन्स्टेबल देशमुख यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात दाखल केली होती.

पोपटराव धायतोंडे - पोलीस निरीक्षक, सदर बाजार पोलीस ठाणे

हजारोंच्या संख्येने नागरिक मोर्चात सहभागी - प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात आक्षेपार्ह किंवा वादग्रस्त वक्तव्य केल्याने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. भारतातील विविध जिल्ह्यात व राज्यात देखील मोर्चे, निषेध आंदोलने होत आहेत. सोलापुरातसुद्धा शुक्रवारी (10 जानेवारी) एमआयएमने मोर्चा काढला होता. शुक्रवारच्या नमाज पठणनंतर मोठ्या प्रमाणात नागरिक मोर्चात सहभागी झाले होते. एमआयएमच्या कार्यालयापासून तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा होता.

मूक मोर्चाची परवानगी असताना घोषणाबाजी केली - सदर बाजार पोलिसांकडून या मोर्चाला परवानगी दिली होती. मात्र, मूक मोर्चा काढला जाणार आहे. शांततेत निषेध व्यक्त केला जाणार आहे, अशी लेखी परवानगी एमआयएमकडून मागितली होती. मात्र, या मोर्चात सहभागी झालेल्या मुस्लिम बांधवांनी घोषणाबाजी केली. तसेच पाच जणांच्या शिष्टमंडळाला निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जावे अशी नियमावली सांगितली. पण मोर्चात सहभागी झालेल्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर चढून गोंधळ घातला. तसेच गेटची साखळी तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, अशी नोंद गुन्हा दाखल झालेल्या तक्रारीत केली आहे.

Last Updated : Jun 12, 2022, 7:43 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.