ETV Bharat / city

सोलापुरात शनिवारी 475 कोरोना बाधित रुग्णांची वाढ;23 मृत्यू - सोलापूर शहर कोरोना अहवाल

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात शनिवारी 635 कोरोना बाधितांनी संसर्गजन्य महामारीवर मात केली आहे. शनिवारी 5 जून रोजी सोलापुरात एकूण 475 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.नव्याने 475 रुग्ण मिळून आल्याने प्रशासन हादरले आहे.

Solapur patient number
सोलापूर शहर कोरोना अहवाल
author img

By

Published : Jun 5, 2021, 10:54 PM IST

सोलापूर - शहर आणि जिल्ह्यात शनिवारी 635 कोरोना बाधितांनी संसर्गजन्य महामारीवर मात केली आहे.त्यांना रुग्णालयातुन घरी सोडण्यात आले आहे. तर शनिवारी 5 जून रोजी सोलापुरात एकूण 475 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.नव्याने 475 रुग्ण मिळून आल्याने प्रशासन हादरले आहे. तर उपचार सुरू असताना एकूण 23 बाधित रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर सोलापूर शहर आणि जिल्ह्यात एकूण ॲक्टिव रुग्णांची संख्या 4490 इतकी झाली आहे.

सोलापूर शहर कोरोना अहवाल

सोलापूर महानगरपालिका आरोग्य प्रशासनाने 2227 संशयीतांची तपासणी केली आहे.त्यामध्ये 15 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. सोलापूर शहरी भागात कोरोना विषाणू किंवा महामारीची लाट ओसरत आहे. यामुळे स्थानिक पालिका प्रशासनाने सोलापूर शहरात अनलॉकची प्रक्रिया सुरू केली आहे. शनिवारी 5 जून रोजी सोलापूर शहरात 53 रुग्णांनी कोरोना संसर्गजन्य आजारावर मात केले आहे. त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन महिन्यांत सोलापूर शहरात पाहिल्यांदा एकही बाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील शहरात कमी होत आहे. सद्यस्थितीत सोलापुरातील विविध रुग्णालयात 300 बाधित रुग्ण ऍक्टिव्ह असून त्यांवर उपचार सुरू आहे.

सोलापूर ग्रामीण भागात मात्र बधितांच्या संख्येत वाढच-

सोलापूर जिल्हा आरोग्य प्रशासनाने जिल्ह्यातील ग्रामीण भागात 13377 संशयीतांची तपासणी केली त्यामध्ये 460 जणांचा अहवाल पॉझीटिव्ह आला आहे.ग्रामीण भागातील रुग्णसंख्या झपाट्याने कमी होण्याऐवजी संथपणे कमी होत आहे.बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे.सोलापुरातील ग्रामीण भागात शनिवारी 582 रुग्णांनी कोरोना संसर्गजन्य आजारावर मात केली आहे. त्यांना रुग्णालयातुन घरी सोडण्यात आले आहे. मात्र मृतांचा आकडा कमी होत नाही.शनिवारी ग्रामीण भागातील विविध तालुक्यात 23 कोरोना पॉझीटिव्ह रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.सोलापुरातील विविध तालुक्यात सद्यस्थितीत 4190 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यांवर उपचार सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.