ETV Bharat / city

शत्रू राष्ट्राचे सॅटेलाईट पाडल्याचे सांगणाऱ्या चंद्रकांत पाटलांच्या कल्पनाशक्तीचे विशेष अभिनंदन, जयंत पाटलांचा टोला

शत्रू राष्ट्राचे सॅटेलाईट पाडल्याचे सांगणाऱ्या चंद्रकांत पाटलांच्या कल्पनाशक्तीच्या आविष्काराचे खास अभिनंदनच केले पाहिजे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला आहे. याच वेळी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन विकास आघाडीमुळे मतांची विभागणी होऊन त्याचा फायदा भाजपला होईल, असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

author img

By

Published : Mar 29, 2019, 7:52 PM IST

जयंत पाटील

सांगली - स्वतःचे सॅटेलाईट पाडले असताना, शत्रू राष्ट्राचे सॅटेलाईट पाडल्याचे सांगणाऱ्या चंद्रकांत पाटलांच्या कल्पनाशक्तीच्या आविष्काराचे खास अभिनंदनच केले पाहिजे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी लगावला आहे. मुख्यमंत्री बनण्याची अभिलाषा चंद्रकांत पाटील बाळगत असून विद्वान चंद्रकांत पाटील यांच्या बद्दल अधिक बोलायची गरज नाही, असा खोचक टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

चंद्रकात पाटील भाजपचे राज्यातील २ नंबरचे नेते त्यांना मुख्यमंत्री बनण्याची अभिलाषा

वसंतदादा घराण्याची काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वाट लावली, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले होते. या आरोपाचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व सांगली जिल्ह्याचे नेते जयंत पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. भारताने अंतराळामधील उपग्रह क्षेपणास्त्र पाडण्याची यशस्वी चाचणी केली. चंद्रकांत पाटील यांनी भारताने शत्रू राष्ट्राचे उपग्रह क्षेपणास्त्राने पाडले आणि ते पाकिस्तानचे आहे की चीनचे आहे? ते कळायचे आहे, असे विधान केले होते. चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्रातील भाजप मधील २ नंबरचे नेते आहेत. त्यांना मुख्यमंत्री बनण्याची सतत अभिलाषा दिसते आणि आपले पंतप्रधान आणि नेते यांनी काय घोषणा केली, त्यांना कळले नाही.
जगाच्या पाठीवर शत्रू राष्ट्राच्या उपग्रह पाडण्याचा उद्योग अजून तरी कोणी केला नाही. पण चंद्रकांतदादा पाटील यांच्या मनात शत्रू राष्ट्रांचे सॅटलाईट पाडण्याची मजल गेली आहे. त्यांच्या कल्पनाशक्तीच्या अविष्काराचे खास अभिनंदन करतो, असे विद्वान महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल फार बोलण्याची गरज वाटत नाही, असा खोचक टोला ही जयंत पाटील यांनी लगावला.

राज्यामध्ये आघाडीच्या २५ ते ३० जागा निवडून येतील

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना जयंत पाटील म्हणाले, राज्यात महाआघाडीला चांगले वातावरण असून उमेदवारी अर्ज भरण्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रातील बऱ्यापैकी सर्व जागांचा वाद मिटला आहे. राज्यामध्ये महाआघाडीच्या २५ ते ३० जागा निवडून येतील.

प्रकाश आंबेडकर भाजपला मदत करत आहेत

प्रकाश आंबेडकर यांनी भाजपला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप विरोधातील दलित आणि मुस्लीम समाज हा काँग्रेस आघाडीला मत देण्याऐवजी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन विकास आघाडीला मत देण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन विकास आघाडीमुळे मतांची विभागणी होऊन त्याचा फायदा भाजपला होणार आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला कोणाचा पाठिंबा आहे, ते सर्व जनतेला आता कळले आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन विकास आघाडीवर केला आहे.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

AVBB

FEED SEND - FILE NAME - R_MH_1_SNG_29_MARCH_2019_JAYANT_PATIL_PRESS_SARFARAJ_SANADI - TO - R_MH_3_SNG_29_MARCH_2019_JAYANT_PATIL_PRESS_SARFARAJ_SANADI

स्लग - शत्रु राष्ट्राचे सॅटलाईट पडणाऱ्या विद्वान महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल बोलण्याची गरज नाही - राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा टोला,तर प्रकाश आंबेडकर यांची भाजपाला मदत .

अँकर - स्वतःचे सॅटलाईट पाडले असताना, शत्रु राष्ट्राचे सॅटलाईट पाडल्याचं सांगणाऱ्या चंद्रकांत पाटलांच्या कल्पनाशक्तीच्या आविष्काराचे खास अभिनंदनचं केले पाहिजे ,असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी लगावला आहे.मुख्यमंत्री बनण्याच्या अभिलाषा चंद्रकांत पाटील बोलत असून विद्वान चंद्रकांत पाटील यांच्या बद्दल अधिक बोलणे गरजेचे नसल्याचा खोचक टोलाही जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वसंतदादा घराण्याची काँग्रेस- राष्ट्रवादीने वाट लावली या आरोपावर लगावला आहे.ते आज सांगली मध्ये बोलत होते.

Body:व्ही वो - महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वसंतदादा घराण्याची काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वाट लावली. या आरोपाचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व सांगली जिल्ह्याचे नेते जयंतराव पाटील यांनी समाचार घेतला आहे.भारताने अंतराळ मधील उपग्रह क्षेपणास्त्र पाडण्याची यशस्वी चाचणी केली.यामध्ये क्षेपणास्त्र पाडला.यावर चंद्रकांत पाटील यांनी भारताने शत्रु राष्ट्राचे उपग्रह क्षेपणास्त्राने पाडले,आणि ते पाकिस्तानचे आहे की चीनचे आहे?ते कळायचे आहे.असे विधान त्यांनी केले आहे.चंद्रकांत दादा पाटील हे महाराष्ट्रातील भाजप मधील दोन नंबरचे नेते आहेत.त्यांना मुख्यमंत्री बनण्याची सतत अभिलाषा दिसते आणि आपले पंतप्रधान आणि नेते यांनी काय घोषणा केली, त्यांना कळलं नाही आणि जगाच्या पाठीवर शत्रू राष्ट्राच्या उपग्रह पाडण्याचा उद्योग अजून तरी कोणी केला नाही. पण चंद्रकांतदादा पाटील यांच्या मनात शत्रू राष्ट्रांचे सॅटलाईट पाडण्याची मजल गेली आहे.आणि त्याच्या कल्पनाशक्तीच्या आविष्काराचे खास अभिनंदन करतो,असा टोला लगावत. अशा विद्वान महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल फारच बोलण्याची गरज वाटत नाही, असा खोचक टोला ही जयंत पाटील यांनी लगावला .

बाईट - जयंत पाटील - प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.

व्ही वो - राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना राज्यभर आपण फिरत आहोत.आणि महाआघाडीला चांगलं वातावरण असून उमेदवारी अर्ज भरण्यास उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे.आणि महाराष्ट्रातील बऱ्यापैकी सर्व जागांचा वाद मिटला आहे. आणि जो काही शिल्लक आहे .तोही संपेल.असं मत जयंत पाटील यांनी व्यक्त करत राज्यामध्ये महाआघाडीच्या २५ ते ३० जागा निवडून येतील,असा विश्वास जयंतराव पाटील यांनी व्यक्त केला आहे.

तसेच प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन विकास आघाडीवर टीका करताना, प्रकाश आंबेडकर यांनी भाजीपाला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.भाजपा विरोधातील दलित आणि मुस्लिम समाज हा काँग्रेस आघाडीला मत देण्याऐवजी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन विकास आघाडीला मत देण्याची शक्यता आहे.त्यामुळे प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन विकास आघाडी मुळे मतांची विभागणी होऊन,त्याचा फायदा भाजपाला होणार आहे.त्यामुळे वंचित बहुजन आघाडी ला कोणाचा पाठिंबा आहे.ते सर्व जनतेला आता कळलं आहे.असा आरोप जयंतराव पाटील यांनी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन विकास आघाडीवर केला आहे.

बाईट - जयंत पाटील - प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.