ETV Bharat / spiritual

दसऱ्याचं काय आहे महत्त्व? जाणून घ्या, आजच्या पंचागासह विजयादशमीची परंपरा

देशभरात आज दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या दसऱ्याचं महत्त्व आणि पंचाग जाणून घेऊ.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 2 hours ago

Vijayadashami 2024
विजयादशमी (Source- ETV Bharat)

हैदराबाद : नऊ दिवसांच्या नवरात्रोत्सवाची आज दसरा या सणानं सांगता होत आहे. दसरा हा विजयादशमी म्हणूनदेखील ओळखला जातो. नवरात्र काळात दुर्गा देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. भारतासह जगभरातील हिंदू नवरात्र भक्तिभावानं साजरा करतात.

भगवान श्रीरामानं रावणावर विजय मिळविल्याचा आनंद आज दसऱ्याच्या दिवशी साजरा केला जातो. देवी दुर्गेनं जनतेला छळणाऱ्या महिषासुरावर विजय मिळविला होता. दसरा हा देशातील महत्त्वाचा सांस्कृतिक आणि अध्यात्मिक महत्त्वाचा सण आहे. केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातील हिंदू आनंदानं आणि उत्साहानं हा उत्सव साजरा करतात. हिंदू कॅलेंडरनुसार, दसरा हा सामान्यत: अश्विन किंवा कार्तिक महिन्याच्या दहाव्या दिवशी येतो.

दसऱ्याचे धार्मिक महत्त्व काय? रामायणानुसार दसरा साजरा करण्याचे मुख्य कारण म्हणजे भगवान रामानं रावणावर विजय मिळविल्याचं स्मरण म्हणून हा सण साजरा केला जातो. अयोध्येचा राजा असलेल्या भगवान रामाची पत्नी सीतेचं रावणानं अपहरण केले होते. भगवान रामानं रावणाला युद्धात पराभूत करून सीतेची सुटका केली होती. आजच्या तिथीला रावणाचा रामानं वध केला होता. हा सण वाईटवर (रावण) चांगल्या (राम) शक्तीच्या विजयाचे प्रतिक आहे.

दसऱ्यामधून मिळणारे मुख्य संदेश आहेत:

  1. सत्याचा विजय: कोणत्याही संकटात किंवा आव्हानात, सत्य आणि धर्माचा नेहमी विजयी ठरते.
  2. शक्ती आणि धैर्य: संघर्षात सामोरे जाण्यासाठी शक्ती आणि धैर्य आवश्यक आहे.
  3. नवीन सुरुवात: दसऱ्याला, आपण आपल्या आयुष्यातील वाईट गोष्टींना दूर ठेवून नवीन सुरुवात करू शकतो.
  4. सामाजिक एकता: हा सण आपल्याला एकत्र येण्याची आणि एकमेकांना सहकार्य करण्याची प्रेरणा देतो.

दसरा साजरा करण्यामागी आणखी एक मान्यता आहे. पौराणिक कथेनुसार महिषासुर या राक्षसावर दुर्गा देवीनं विजय मिळविला होता. दुर्गानं महिषासुर यांच्यातील युद्ध हे वाईटावर चांगल्याचा विजय आणि सत्यासह धर्माचा विजय दर्शवते. दसऱ्याशी दिवशी रामलीला केली जाते. यामध्ये रामायणावर आधारित नाटक सादर केले जातात. दसऱ्याच्या दिवशी रावण, मेघनाद, कुंभकर्ण यांच्या पुतळ्यांचे दहन केले जाते. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी अनेक ठिकाणी दांडियाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. गुजरातचा दांडिया देशभरात प्रसिद्ध आहे.

आज पंचाग कसे आहे?- आज शनिवार, 12 ऑक्टोबर 2024, अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाची नववी तिथी आहे. माता सरस्वती या तिथीची अधिपती आहे. शत्रू आणि प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध योजना बनवण्यासाठी हा दिवस चांगला आहे. परंतु कोणत्याही शुभ समारंभासाठी आणि प्रवासासाठी ही अशुभ तिथी मानली जाते.

  • खरेदीसाठी आज उत्तम नक्षत्र - आज चंद्र मकर राशीत आणि श्रवण नक्षत्रात असेल. हे नक्षत्र मकर राशीमध्ये 10 अंश ते 23:20 पर्यंत विस्तारते. त्याची देवता हरी आहे. या नक्षत्रावर चंद्राचे राज्य आहे. हा एक गतिमान तारा आहे. या काळात प्रवास करणे, वाहन चालवणे, बागकाम करणे, मिरवणुकीत जाणे, मित्रांना भेटणे, खरेदी करणे आणि कोणत्याही प्रकारचे तात्पुरते स्वरूपाचे काम करता येते.
  • दिवसाची निषिद्ध वेळ-आज राहुकाल सकाळी 09:30 ते 10:58 पर्यंत असेल. अशा स्थितीत कोणतेही शुभ कार्य करायचे असल्यास हा कालावधी टाळणेच योग्य राहील. त्याचप्रमाणे यमगंड, गुलिक, दुमुहूर्त आणि वर्ज्यम हे देखील टाळावे.

12 ऑक्टोबरचे पंचांग:

विक्रम संवत: 2080

  • महिना: अश्विन
  • पक्ष : शुक्ल पक्ष
  • दिवस: शनिवार
  • तिथी : नवमी
  • योग: धृती
  • नक्षत्र : श्रावण
  • करण : कौलव
  • चंद्र राशी: मकर
  • सूर्य राशी: कन्या
  • सूर्योदय: 06:35:00 सकाळी
  • सूर्यास्त: 06:16:00 सायंकाळी
  • चंद्रोदय: दुपारी 02:40:00
  • चंद्रास्त: 1:26:00 पहाटे
  • राहुकाल : 9:30 ते 10:58
  • यमगंड: 13:53 ते 15:20

हेही वाचा-

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.