ETV Bharat / health-and-lifestyle

नियमीत खा 'हे' फळं; तणावापासून रहा मुक्त - FRUITS FOR STRESS RELIEF

मानसिक आरोग्यासंबंधित आजारामध्ये वाढ होत आहे. आज दहापैकी एक जण नैराश्याचा बळी पडत आहे. तुम्हाला माहिती आहे काय, नैराश्य कमी करण्यासाठी काही फळं फायदेशीर आहेत.

Fruits for stress relief
मानसिक आरोग्यासाठी फळं फायदेशीर (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Health Team

Published : Oct 12, 2024, 7:00 AM IST

Updated : Oct 12, 2024, 5:07 PM IST

Fruits for stress relief: जगभरातील लोक मानसिक तणावामुळं चिंतेत आहेत. दीर्घकाळ चिंतेत राहिल्यास मानसिक स्वास्थ्यासोबतच शारीरिक आरोग्यावर देखील गंभीर परिणाम होतात. तणावात जीवन जगणं हे प्राणघातक ठरू शकतं, असं अनेक संशोधनात पुढं आलं आहे. ऑफिसचा स्ट्रेस, स्पर्धात्मक जग, कौटुंबिक वाद त्याचबरोबर रोजच्या जीवनातील नैराश्यमयी प्रसंगांमुळं आपण नकळत मानसिक त्रासात लोटले जातो. तुम्ही देखील तणावाला बळी पडले आहात का? असल्यास योग्य वेळी उपचार करणं गरजेचं आहे. कारण दीर्घकाळ तणामध्ये राहिल्यास तुम्हाला हृदय रोग, चयापचय, रक्तदाब अशा गंभीर आरोग्यविषयक आजारांची लागण होऊ शकते. त्यापासून सुटका पाहिजे असेल तर अशी काही फळं आहेत, जी मानसिक तणावाशी लढण्यासाठी फायदेशीर आहेत. यांच्या नियमित सेवनामुळे तुम्ही काही प्रमाणात तणामुक्त राहू होवू शकता.

  • सफरचंद: सफरचंद अ‍ॅंटिऑक्सिडंट्स, फायबर, व्हिटॅमिन सी या पोषक घटकांनी परिपूर्ण आहे. यामध्ये असलेल्या पोषक तत्वामुळं तणाव कमी करण्यास मदत होते. रोज एक सफचंद खाल्ल्यास तुम्ही तणाव मुक्त तर राहाल तसंच इतर आजारांवर देखील सफरचंद रामबाण आहे. सफरचंद आरोग्याच्या दृष्टीनं एक महत्त्वाचं आणि फायदेशीर फळ आहे.
Fruits for stress relief
सफरचंद (ETV Bharat)
  • पेरू: असं माणलं जातं की, व्हिटॅमिन सीने समृद्ध फळांचा आहारात समावेश केल्यास मानसिक ताण कमी होतो. पेरूमध्ये पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळते. यामुळं नियमित पेरू खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. थंडीच्या दिवसामध्ये पेरू खाल्ल्यास अनेक आजारांशी लढण्यास मदत होते. तसंच तणाव देखील कमी होतो.
Fruits for stress relief
पेरू (ETV Bharat)
  • केळी: केळीमध्ये अनेक जीवनसत्वे, पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी 6, फॉस्फरस आढळतात. तणामध्ये केळीचं सेवन फायदेशीर ठरू शकतं. केळीच सेवनानं स्ट्रेस हार्मोन्स नियंत्रित होऊन तणाव दूर होतात.केळीमध्ये आढळणारं मॅग्नेशियम नैराश्य आणि तणावाशी लढण्यास मदत करतं. तसंच त्यात आढळणारं व्हिटॅमिन बी 6 सेरोटोनिन नावाच्या न्यरोटरांसमीटरच्या उत्पादनास प्रोत्साहित करतं. यामुळं मूड सुधारतो. मन शांत राहतं.
Fruits for stress relief
केळी (ETV Bharat)
  • द्राक्ष : द्राक्षामध्ये पोटॅशियम, सोडियम, लोह पुरेशा प्रमाणात असतो. मानसिक ताण तणाव दूर करण्यासाठी हे फायदेशीर आहे.
Fruits for stress relief
द्राक्षं (ETV Bharat)
  • डाळिंब: डाळिंब खाल्ल्यास तणावापासून आराम मिळतो. डाळिंबामध्ये अ‍ॅंटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असतात. व्हिटॅमिन सी स्ट्रेस हार्मोन्स कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. तसंच यात आढळणारं अ‍ॅंटिऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्सशी लढतात परिणामी तणाव कमी होण्यास मदत होते.
Fruits for stress relief
डाळिंब (ETV Bharat)

संदर्भ

https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC7019743/

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा

  1. दीर्घायुष्यासाठी वापरा जपानी फंडा; असे रहा सुदृढ
  2. तुम्ही सतत चिंताग्रस्त असता का? ट्राय करा 'या' टिप्स

Last Updated : Oct 12, 2024, 5:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.