ETV Bharat / city

Water Cut : पुण्यातील पाणी कपातीचा निर्णय रद्द, आषाढी वारी, बकरी ईद सणांमुळे 8 ते 11 जुलैपर्यंत दररोज पाणी मिळणार - आषाढी वारी

आषाढी वारी आणि बकरी ईद या सणांमुळे आठ जुलै ते अकरा जुलै या कालावधीत शहरातील पाणीकपात तात्पुरती रद्द करण्याचा निर्णय महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे. आषाढी वारी,( Ashadi Wari ) बकरी ईद ( Eid festivals ) सणांमुळे 8 ते 11 जुलैपर्यंत दररोज पाणी मिळणार आहे.

Pune Municipal Corporation
पुणे महानगरपालिका
author img

By

Published : Jul 6, 2022, 10:44 PM IST

पुणे - शहरातील पाणीकपात तात्पुरती रद्द ( water cut decision canceled ) करण्याचा निर्णय महापालिकेच्या ( Pune Municipal Corporation ) पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे. आषाढी वारी ( Ashadi Wari ) आणि बकरी ईद ( Eid festivals ) या सणांमुळे आठ जुलै ते अकरा जुलै या कालावधीत पाणीकपात न करता पूर्ववत पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. दरम्यान, मान्सून सक्रीय झाल्याने धरणातील पाणीसाठाही वाढत आहे. त्यातच पाणीकपात ११ जुलै पर्यंतच असल्याने पाणीकपात जवळपास रद्द करण्यात आल्याचे संकेत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आले आहेत. शहराला पाणाीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत पाणी कमी झाल्याने महापालिकेने पाणीकपातीचा निर्णय घेतला होता.

हेही वाचा - Gulabrao Patil : 40 आमदारानंतर 12 खासदार एकनाथ शिंदे गटात सामील होणार- गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट

त्यानुसार दिवसाआ़ड पाणीपुरवठा करण्याचे निश्चित करण्यात आले. या निर्णयाची अंमलबजावणी सोमवारपासून (४ जुलै) पुढील आठ दिवसांसाठी म्हणजे ११ जुलैपर्यंत होणार होती. या कालावधीत पडणारा पाऊस तसेच धरणांमधील पाणीसाठा विचारात घेऊन पाणी वितरण व्यवस्थेचे पुढील नियोजन करण्याचे प्रस्तावित होते. मात्र, त्यापूर्वीच पाणीकपात तात्पुरती रद्द करण्याचा निर्णय बुधवारी घेण्यात आला.

पावसाने दिलेली ओढ, पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरण साखळीत कमी झालेला पाणीसाठा, यामुळे पुणेकरांना एक दिवसा आड पाणी देण्याचा निर्णय महानगर पालिका घेतला होता . त्यामुळं त्यापुणेकरांना पाण्याची चिंता होती. गेले दोन दिवस पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे पाणी पातळीत वाढ झाली आहे. मंगळवारी रात्रीपासून बुधवारी सकाळपर्यंत टेमघर धरण क्षेत्रात ६५ मिलिमीटर, वरसगाव धरण परिसरात ७० मि.मी, पानशेत धरण परिसरात ६८ मि.मी, तर खडकवासला धरण क्षेत्रात १८ मि.मी पावसाची नोंद झाली आहे. सध्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात ३.६७ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच १२.५९ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मंगळवारी रात्री चारही धरणांत ३.३५ टीएमसी पाणीसाठा होता. मंगळवारी रात्रीच्या तुलनेत बुधवारी सकाळी ०.३२ टीएमसीने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा - Bhaskar Jadhav Farming : शिवसेनेचे आक्रमक भास्कर जाधव रमले लागवडीच्या कामात; पाहा त्यांचा भलरीचा Video

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.