पुणे - संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना 'स्टेपनी' असे संबोधले होते. यावर माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी भाष्य करत अजित पवार यांचे समर्थक अजुनही गप्प का आहेत ? असा सवाल केला. अजित पवार यांचा अवघ्या राजकीय जीवनात असा अपमान आपण पाहिला नसल्याचेही तावडे यांनी म्हटले आहे. पिंपरी-चिंचवड येथे आले असता तावडे यांनी माध्यम प्रतिनिधींसोबत बोलताना आपली प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा... जम्मू-काश्मीरच्या माजी अर्थमंत्र्यांच्या मुलाला एसीबीकडून अटक!
पुण्यात एका मुलाखती दरम्यान बोलताना खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांना, स्टेपनी असे म्हटले होते. तरीही अजित पवार यांचे समर्थक गप्प कसे आहेत. खुर्चीचे मोल इतके असते का ? असा प्रश्नही तावडे यांनी उपस्थीत केला.
अजित पवार यांचा माझ्या राजकीय आयुष्यात असा अपमान मी पाहिला नसल्याचेही तावडेंनी म्हटले आहे. अजितदादा हे खरंच स्टेपनी आहेत की, मेन व्हील आहेत. हे त्यांच्या समर्थकांनी सांगावे, असा चिमटाही त्यांनी काढला.
हेही वाचा... सनदी लेखापाल (सीए) परीक्षेत अभय बजोरिया आणि सुर्यांश अगरवाल देशात प्रथम
ज्यावेळी आमच्याकडे अजित पवार आले तेव्हा ते मेन व्हील घेऊन आले होते. पण त्यांचा रिमोट कंट्रोल हा शरद पवार यांच्या हातात होता, असेही तावडे यावेळी म्हणाले. दरम्यान, सीएए बद्दल बोलताना तावडे यांनी, विरोधक जाणीवपूर्वक नागरिकत्व कायद्याच्या विरोधामध्ये मुस्लिम समाजाला घाबरवण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे.