पुणे - रघुनाथ कुचीक प्रत्येक गोष्ट खोटे बोलत आहेत. आत्तापर्यंत मी गप्प होते कारण माझ्याकडे माझ्या डीएनए चाचणीचा रिपोर्ट नव्हता. पण आता तो आला आहे. आता रघुनाथ कुचीक ( Raghunath Kuchik Case ) यांनी सुद्धा आपली डीएनए टेस्ट ( DNA test ) करावी, अशी मागणी रघुनाथ कुचीक यांच्यावर आरोप करणाऱ्या पीडितेने केली आहे. त्याचबरोबर माझ्याकडे जे काही पुरावे आहेत, ते सगळे पुरावे घेऊन मी मुंबई हायकोर्टात ( Mumbai High Court ) जाणार असल्याचे देखील पिडीतेने आज (गुरुवारी) पुण्यात पत्रकार परिषद घेत सांगितले आहे.
'त्या' नंबरचा मी फॉरेन्सिक रिपोर्ट काढून कोर्टात देणार' : रघुनाथ कुचीक नेहमी मला मेसेज करायचे आणि आता ते म्हणतात की माझा नंबर मोर्फ करून वापरला गेला. मात्र तसे नसून मी त्या नंबरची फॉरेन्सिक टेस्ट केली आहे. ती टेस्ट सरकारी असते. ज्या फोरेन्सिक टेस्टमधून सगळे काही उघड झाल असून आता ती फॉरेन्सिक रिपोर्ट देखील मी कोर्टात देणार असल्याचे त्या तरुणीने सांगितले आहे.
'महिला आयोगाने माझे कधीच ऐकल नाही' : या सगळ्या प्रकरणी काही दिवसांपूर्वी रघुनाथ कुचीक यांच्या मुलीने, तरुणी आरोप करत आहेत त्यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी केली होती. त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी लगेचच ती मागणी मान्य देखील केली आहे. आता त्यावर विचार होत असल्याचे सांगितले होते. त्यावर बोलताना या पीडितेने मी अनेकदा रूपाली चाकणकर यांच्याशी संपर्क करायचा प्रयत्न केला, पण त्यांनी मला उत्तर दिले नाही. ज्याप्रमाणे रघुनाथ कुचीक यांच्या मुलीची मागणी मान्य झाली, तसेच न्याय मलाही मिळावा, अशी अपेक्षा पीडित तरुणीने व्यक्त केली आहे.