ETV Bharat / city

पिंपरीत आयपीएल सामन्यांवर सट्टा, २४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत - आयपीएल २०२० सट्टेबाजी

पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वैभव नगर येथे अज्ञात दोनजण आयपीएलच्या क्रिकेट सामन्यावर बेटिंग करत असल्याची माहिती पिंपरी पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकून कारवाई करण्यात आली आहे.

Three arrested for betting on IPL match in pimpri
पिंपरीत आयपीएल सामन्यांवर सट्टा, २४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
author img

By

Published : Sep 26, 2020, 10:49 PM IST

पुणे - पिंपरीत इनोव्हामधून फिरून आयपीएल क्रिकेटच्या सामन्यावर बेटिंग करणाऱ्या दोघांना पिंपरी पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून २४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी लालचंद देवीदास शर्मा (वय ४९) आणि घेतन जयरामदास फोटयाणी (वय ५०) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वैभव नगर येथे अज्ञात दोनजण आयपीएलच्या क्रिकेट सामन्यावर बेटिंग करत असल्याची माहिती पिंपरी पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित ठिकाणी छापा टाकून ४ मोबाईल, रोख रक्कम ५ हजार, इनोव्हा मोटार असा एकूण २४ लाख २७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Three arrested for betting on IPL match in pimpri
पिंपरीत सट्टेबाजीसाठी वापरण्यात आलेली इनोव्हा कार

याप्रकरणी दोन्ही आरोपींवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनीयम कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलींद वाघमारे, गुन्हे पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सधिन सुर्यवंशी पोलीस कर्मचारी खणसे, काकडे, हांडे, भारती, धायगुडे, मंड, सोनवणे, जाधव, काडे यांच्या पथकाने केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.